बीज सम्राट, सम्राज्ञी स्पर्धा पोस्टरचे अनावरण:निसर्गकट्टा तसेच सामाजिक वनीकरण विभागाचा संयुक्त उपक्रम
प्रतिनिधी | अकोला विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजवण्यासाठी निसर्गकट्टा आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बीज सम्राट व साम्राज्ञी स्पर्धा–२०२६’ या उपक्रमाच्या पोस्टरचे नुकतेच उत्साहात विमोचन करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात विभागीय वन अधिकारी रोहित चोबे, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे प्रतिनिधी संजय सेंगर, निसर्गकट्टाचे अमोल सावंत तसेच…