Headlines

टाकळीतील शेतमजुराच्या मुलाची सैन्य दलात निवड:लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण‎




पैठण तालुक्यातील टाकळी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील सोपान संजय लाटे याची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली आहे. सोपानने दुसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोपान सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करत होता. यासाठी तो प्रचंड मेहतन घेत होता. परंतु पहिल्या वेळेस सैन्य भरती प्रक्रियेत त्याला अपयश आले . परंतु त्याच्या मनात फौजी बनण्याचे स्वप्न त्याला कधीही स्वस्त बसू देत नव्हते. लहानपणापासून सैन्य भरतीचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. त्यादृष्टीने त्याचे अतोनात प्रयत्नही सुरु होते. अखेर त्याचे सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण झाले असून त्याची जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीला यश आले आहे. सोपानचे वडील शेती काम तर आई मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात. सोपानचे प्राथमिक शिक्षण टाकळी येथील जिल्हा प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण ढोरकीन येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तसेच ढोरकीन येथील मानसिंगभाऊ पवार कनिष्ठ महाविद्यालयातून त्याने बीए मधून पदवी प्राप्त केली आहे. सोपानच्या या कामगिरीबद्दल टाकळीसह परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या आई- वडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे. देशसेवेचे स्वप्न पूर्ण Ãमाझी खुप दिवसापासून इच्छा होती की, मी सैन्य दलात नोकरी करून देश सेवा करावी. अखेर ते स्वप्न पूर्ण झाले. मला मोठे करण्यात माझे आई- वडील, गुरुजनांचा सिंहाचा वाटा आहे. अविरत शारीरिक कसरत, परिश्रम व सातत्यपूर्ण सराव, यामुळच मला यश मिळाले आहे. -सोपान लाटे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *