शिऊर येथील संत बहिणाबाईंच्या वंशजांचा पुणे शहरामध्ये सन्मान:तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी व संतांच्या वंशजांचा होतो सत्कार
वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शिऊर येथील संत बहिणाबाई महाराजांचे वंशज पवन गुरुजी पाठक यांचा पुण्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. . गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी आणि संतांचे वंशज यांचे पूजन आषाढी एकादशीपूर्वी करण्यात येत असून, यंदाचे हे चौथे वर्षे आहे. पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या या माऊलींचा प्रवास सुसह्य व्हावा…