Headlines

यंदा मान्सूनपूर्वच्या नऊ दिवस आधीच बेमोसमीचे दाटले ढग:गेल्या वर्षी मे महिन्यात 104 मिमी बरसला, शहराचा पारा 37 अंशावर‎

अहिल्यानगर अहिल्यानगर शहरात एप्रिल महिन्यात तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत पोहोचल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहेत. तापमानाचा पारा ३७ ते ३९ अंशांदरम्यान स्थिरावलेला असतानाच, यंदाही मे महिन्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. साधारणपणे १५ मे नंतर अपेक्षित असलेला मान्सूनपूर्व पाऊस यंदा नऊ दिवस आधीच हजेरी लावण्याची शक्यता आहे. गुरुवारी शहरात दिवसभर…

Read More

आदित्य ठाकरेंनी लायकीत अन् शिस्तीत बोलावे:मी बोललो तर तुम्ही शब्द ऐकू शकणार नाही, शिंदेंवरील टीकेनंतर नीलेश राणे आक्रमक

ठाकरे गट आणि राणे कुटुंबियांमधील राजकीय कलगीतुरा पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. आमदार नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरेंनी लायकीत आणि शिस्तीत बोलावे, नाही तर आमचा तोल सुटायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेचे आमदार नीलेश राणे…

Read More

विज्युक्टा’चे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन:मोफत शिक्षण संपवण्याच्या धोरणाविरोधात शिक्षकांचा आक्रमक पवित्रा

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा) ने बुधवारी अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शासनाच्या मोफत शिक्षण संपवण्याच्या आणि शिक्षकांची संख्या घटवण्याच्या धोरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दुपारपर्यंत कार्यालयाला घेराव घातला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकांच्या मते, शासनाने सामान्यांचे मोफत शिक्षण संपुष्टात आणण्याचा डाव आखला आहे. याचाच एक भाग…

Read More

ट्रोलिंगवर आलिया भट्टच्या समर्थनार्थ आले सोनू सूद:कान्समध्ये दुर्लक्षित झाल्याच्या दाव्यांवर बोलले – आपल्या लोकांच्या चुका काढू नका, कष्टाचा अभिमान बाळगा

अभिनेत्री आलिया भट्ट कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये तिच्या लूकमुळे चर्चेत राहिली, पण सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असा दावा करण्यात आला की, आंतरराष्ट्रीय पापाराझींनी तिला दुर्लक्षित केले. आता अभिनेता सोनू सूद आलियाच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. सोनूने लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कलाकारांचे मनोबल…

Read More

JNPA Container Yard Fire; Uran Blaze Engulfs Yard

मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) जवळ, उरण येथील गव्हान फाटा येथे एका माल हाताळणी गोदामात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर यार्डमधील एका शेडम . दृश्यांमध्ये कंटेनर यार्डच्या वर धुराचा प्रचंड लोट दिसत असून, तो दूरवरूनही स्पष्ट दिसत आहे. पनवेलहून अग्निशमन दलाचे…

Read More

जलयात्रेच्या स्वागतावरून वैजापूरमध्ये गटबाजी उघड:सेना-भाजप समोरासमोर, एकाच जलसंवर्धन मोहिमेचे दोन स्वागत सोहळे‎

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन, शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा संदेश देणारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा सोमवारी दुपारी २ वाजता गंगापूर–वैजापूर रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालयात दाखल झाली. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. या वेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, आ. प्रशांत बंब, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, सभापती कविताताई चव्हाण उपस्थित होते….

Read More

रांजणगाव महागणपती मंदिर 3 महिने बंद राहणार:जतन व संवर्धन कामांमुळे 15 एप्रिल ते 31जुलै 2026 पर्यंत भाविकांना प्रवेश नाही

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कामे अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत ही दुरुस्ती व संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून…

Read More

सेलेब्रिटींच्या अंगरक्षकांची वार्षिक कमाई कोट्यवधींमध्ये नसते:शाहरुख खानच्या माजी अंगरक्षकाने सोशल मीडियावर पगाराच्या दाव्यांचे सत्य सांगितले

अभिनेता शाहरुख खानचे माजी बॉडीगार्ड यासीन खान यांनी नुकतेच सांगितले की, सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सना दोन ते अडीच कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो, हे दावे चुकीचे आहेत. यासीन खान यांनी हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सोशल मीडियावर बॉडीगार्ड्सच्या कमाईबद्दल जे आकडे सांगितले जातात, ते खूप वाढवून सांगितले जातात. त्यांनी सांगितले की, कोणत्याही मोठ्या स्टारसोबत काम करणाऱ्या…

Read More

संभाजीनगरमध्ये 40 चार्जिंग स्टेशन; 100 स्टेशनची मनपाची घोषणा फोल:ईव्हींची विक्री 4 वर्षांत 107% वाढली, मात्र 881 वाहनांमागे केवळ एकच चार्जिंग स्टेशन

छत्रपती संभाजीनगर शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) क्रेझ झपाट्याने वाढत आहे, गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ईव्ही वाहनांच्या संख्येत तब्बल 107 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, एकीकडे वाहनांची संख्या सुसाट वेगाने वाढत असताना, दुसरीकडे चार्जिंग सुविधांच्या बाबतीत मात्र शहर अद्याप ‘स्लो ट्रॅक’वरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरात 2022-23 मध्ये 5,435 ईव्ही विक्रीची…

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली. आज दोघांची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी…

Read More