Headlines

एन्काउंटर स्पेशालिस्ट नेमून निवडणुका जिंकणे हा कसला पराक्रम?:संजय राऊतांचा मोदी-शाहांना सवाल, बच्चू कडूंच्या विलीनीकरणावरही शंका व्यक्त

देशातील निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज का भासते?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला ‘दहशतवाद’ असे…

Read More

पंचायत विकास आराखडा ऑनलाईन प्रशिक्षणाला जि.प. विभागप्रमुखांची उपस्थिती:"सर्वांची योजना-सर्वांचा विकास" अंतर्गत नियोजन प्रक्रियेवर मार्गदर्शन

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात गुरुवारी “सर्वांची योजना-सर्वांचा विकास” या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रियेवर आधारित या कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रभावीपणे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले….

Read More

Fadnavis Announcement: Farmer Loan Waiver List & Protest Statement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शन आणि दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनांवर भूमिका मांडली. उद्या शेतकरी कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहि . उद्याच कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उद्याच (22 जुलै) प्राथमिक…

Read More

नाशिक विधान परिषदेत महायुतीतील बंड शमले:अखेर गोकुळ गीते यांची माघार; कुणाल दरडेंचा मार्ग सुकर; महायुतीच्या नेत्यांची शिष्टाई फळाला

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी शमवण्यात नेत्यांना मोठे यश आले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू असलेले मनधरणीचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. गोकुळ गीते यांनी केवळ माघारच घेतली नाही, तर…

Read More

शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते….

Read More

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी!:'लालबागच्या राजा'चे पाऊलपूजन संपन्न; आजपासून मूर्ती साकारण्याच्या कामाला सुरुवात

राज्यात अद्याप वरुणराजाचे दमदार आगमन झाले नसले आणि सर्वसामान्य नागरिक पावसाची वाट पाहत असले, तरी मुंबईत मात्र तमाम गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या आगमनाची सुखद चाहूल लागली आहे. पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रात वेध लागतात ते लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे आणि सण-उत्सवांचे. याच पार्श्वभूमीवर, जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे आज पहाटे पारंपरिक आणि विधीवत…

Read More

पंढरपूर कॉरिडॉर, उजनी पर्यटन विरोधात एल्गार‎:अधिकारी आणि पालक मंत्र्यांकडून उपोषणाची दखल नाही

उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जल पर्यटन प्रकल्प व अतिरिक्त संपादित जमिनींच्या मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाचा उद्या तिसरा दिवस असून शासनाने कसलाच प्रतिसाद न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माढा तालुका उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मागण्यांकडे लक्ष…

Read More

चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढ 7.8% राहिली:आर्थिक वर्ष-26 मध्ये अर्थव्यवस्था 7.7% दराने वाढली, फेब्रुवारीमध्ये सरकारने हा अंदाज 7.6% सांगितला होता

आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) जीडीपी वाढ 7.8% राहिली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 5 जून रोजी ही आकडेवारी जाहीर केली. यावेळी जीडीपीची गणना आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 च्या आधारावर करण्यात आली आहे. सरकारने सांगितले की, संपूर्ण आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जीडीपी 7.7% दराने वाढला आहे, जो मागील वर्षी 7.1% होता. यापूर्वी…

Read More

हाय प्रोफाइल केसेस हातळणाऱ्या ED अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती!:नीरव मोदी, मेहुल चोक्सीसह नवाब मलिक अन् संजय राऊतांच्या केसचाही केला होता तपास

सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी सेवेची 11 वर्षे शिल्लक असतानाच अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्याने प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या सिलीगुडी येथे कार्यरत असलेल्या सत्यव्रत कुमार यांनी यापूर्वी सुमारे 11 वर्षे मुंबईत सहसंचालक म्हणून काम पाहिले होते. मुंबईतील या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि पंजाब नॅशनल…

Read More

शहरात पावसाची हजेरी:मात्र उकाडा कायम, शेतकऱ्यांना चिंता

शहरात शनिवारी (दि. १३) दुपारी अती हलक्या पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे काही काळ शहरात गारवा निर्माण झाला होता. परंतु पाऊस काही मिनिटांचाच असल्याने त्यानंतर पुन्हा उकाड्याची तीव्रता वाढली. परिणामी नागरिकांना दमट वातावरणाचा सामना करावा लागला. एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे मान्सूनवर होत असलेला प्रभाव आणि त्यामुळे निर्माण झालेला पावसाचा विलंब शेतकऱ्यांची चिंता…

Read More