पाण्यासाठी चव्हाण वस्तीवरील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा:सरपंच कसबे यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
सुस्ते (ता. पंढरपूर) येथील चव्हाणवस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी डोक्यावर घागरी आणि हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चव्हाणवस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत…