साहित्य अनुभव अन् विचारांचे व्यासपीठ:बार्शीमध्ये राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
साहित्य हे विवेक, सृजनशीलता आणि मुक्त आविष्कारातून निर्माण झाले तर ते रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच शिष्टाचार आणि भ्रष्टाचाराची चिकित्सक दृष्टीही प्रदान करते. साहित्य हे विविध अनुभवांची खाण असून मुक्त होण्याचे खुले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक (पुणे) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-बार्शी यांच्या वतीने…