Headlines

वडाळी तलावाजवळ बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार:मंत्री संजय राठोड यांनी स्थळाची केली पाहणी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज, शनिवारी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळाला भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान मंत्री राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक आणि दिमाखदार स्मारक उभारण्याचे निर्देश दिले. हे स्मारक शहरातील मुख्य रस्त्यावरून स्पष्टपणे…

Read More

‘प्रहार’चा पाठपुरावा; शेतकऱ्यांना सिंचन योजनेतून मिळणार पाणी:तालुक्यात कोरडवाहू भागातील 12 गावच्या शेतकऱ्यांचा समावेश

तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना (भाग-१) मधून पूर्णपणे वगळण्यात आलेल्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून, स्वतंत्र उपसा जलसिंचन योजनेस शासनाची मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे वऱ्हा मालधुर, धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा बुद्रूक, शिवणगावसह १२ गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय देशमुख यांनी या…

Read More

हवामानातील बदलामुळे अमरावती जिल्ह्यात मोठा निर्णय:16.85 लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी 3 महिन्यांचे धान्य

हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील १६.८५ लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. हा एकत्रित धान्यपुरवठा एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी असेल. लाभार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार ३० जूनपर्यंत या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात अंत्योदय…

Read More

ऑनलाइन प्रवेशाची मुदत संपली:ॲडमिशन हुकल्याने कल्याणमधील 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याच्या नैराश्यातून कल्याणमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता; मात्र ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचे समजल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षदाने नुकतीच वाणिज्यशाखेतून बारावीची…

Read More

संगमनेरशहराच्या विकासाचा १०० दिवसांच्या कामांचा लेखाजोखा:महिला सुरक्षा दल ठरले राज्यासाठी मॉडेल; तक्रार निवारण ॲपद्वारे ३१७ प्रश्न मार्गी‎

प्रतिनिधी |संगमनेर नगरपरिषदेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत नक्की काय बदल झाले? याचा लेखाजोखा सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. ‘संगमनेर २.०’ या संकल्पनेतून शहराचा शाश्वत विकास करतानाच, प्रशासकीय मरगळ झटकून ३९ विभागनिहाय बैठकांद्वारे कामांना गती देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर…

Read More

जायकवाडी धरणातून 1.917 दलघमीचे दररोज बाष्पीभवन:सध्या धरणातील पाणीसाठा 45.60% उपलब्ध

जायकवाडी धरणातून जालना, छत्रपती संभाजीनगरला एक महिना पुरेल इतक्या पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ४५.६० टक्क्यांवर असून याच कालावधीत मागील वर्षी तो ३७.९७ टक्के होता. गेल्या वर्षी बाष्पीभवनाचा दर सुमारे २ दलघमीपर्यंत पोहोचला होता. तर यंदा तो १.९१७ दलघमी इतका नोंदवला गेला आहे. मे महिन्यातील बाष्पीभवन गेल्या वर्षी २ दलघमीपर्यंत गेले होते….

Read More

अवनीत कौरने प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मौन सोडले:अभिनेत्री म्हणाली- वयानुसार लूकमध्ये नैसर्गिक बदल झाला आहे

अभिनेत्री अवनीत कौरने नुकतेच तिच्या दिसण्याबद्दल सुरू असलेल्या प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्सच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. तिने स्पष्ट केले की तिच्या दिसण्यातील बदल वयानुसार नैसर्गिकरित्या झाला आहे. विशेष म्हणजे, अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. वेळेनुसार तिच्या दिसण्यात आलेल्या बदलांबद्दल सोशल मीडियावर काही लोकांकडून बोटॉक्स किंवा प्लास्टिक सर्जरी…

Read More

अमरावतीत प्रेयसीला व्यसनाची माहिती दिल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:माहिती देणाऱ्या नातेवाईक दांपत्याविरुद्ध कुऱ्हा पोलिसांत गुन्हा दाखल

तरुणाचे व्यसन आणि घरातील कौटुंबिक वादाची माहिती प्रेयसीला देऊन लग्न मोडण्यास कारणीभूत ठरलेल्या नातेवाईक दांपत्याविरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने धक्का सहन न होऊन एका 27 वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

मुंबईला ड्रग्जचा विळखा:अंधेरीत घरावर छापेमारीतून 30 कोटींचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त, नेस्को’ कॉन्सर्टमधील २ विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे ड्रग्जविरोधी अभियानावर सवाल

नशामुक्त महाराष्ट्राच्या दाव्यांना मुंबईतील ताज्या घटनांनी जोरदार चपराक लगावली आहे. एका बाजूला गोरेगावमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या दोन २४ वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे; तर दुसरीकडे पोलिसांनी अंधेरीत मोठी कारवाई करत चक्क १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीतून तब्बल ३० कोटी रुपयांचे ‘एमडी’ ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. एकापाठोपाठ उघडकीस…

Read More

समाजाच्या प्रगतीसाठी धर्म, संस्कार समाजसेवेचे व्रत अंगिकारावे:उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराज यांचे युवकांना आवाहन, महाप्रसादाने सोहळ्याची सांगता‎

नवी पेठ जैन धर्मस्थानकाला मोठा गौरवशाली इतिहास आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. हे स्थान केवळ एक वास्तू नसून शहराच्या आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. येथील ज्येष्ठ समाजबांधवांनी श्रद्धेची आणि एकोप्याची जी परंपरा जोपासली आहे, तीच खरी संपत्ती आहे. आजच्या ब . याप्रसंगी आयोजित धर्मसभेत पूज्य उपाध्याय प्रवर श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांनी आपल्या प्रभावी वाणीतून उपस्थितांना…

Read More