Headlines

पीएमपी चालकाला भररस्त्यात मारहाण:गाडी घासल्याच्या वादातून मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कोंढव्यातील येवलेवाडी भागात गाडी घासल्याच्या वादातून एका मोटार चालकाने पीएमपी चालकाला भररस्त्यात मारहाण केली. या प्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीएमपी चालक अशोक पांडुरंग पवार (वय ४०) यांनी याबाबत येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीएमपी बस सासवडकडे जात होती. येवलेवाडी परिसरात…

Read More

CBI Moves High Court; Amit Shah Directs Action

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या काही तासांतच आता देशपातळीवर मोठ्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या . मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांची चर्चा मुंबई सत्र न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावामुळे सर्व आरोपींची सुटका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले…

Read More

सियाचा चेतनसोबतचा नवीन VIDEO आला समोर:क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते; केतनच्या कुटुंबीयांनी कॅन्डल मार्च काढला

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात आरोपी सिया गोयल तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत महाराष्ट्र क्रिकेट लीगचा सामना पाहताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये कॅन्डल मार्च काढला. यावेळी त्यांनी केतनला…

Read More

लोकप्रतिनिधी तात्पुरते, अधिकारी कायमचे; जनतेची कामे वेळेत करा:पाटोद्यात महसूल समाधान शिबिर; सभापती सचिन गरड यांचे आवाहन‎

लोकप्रतिनिधी दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र प्रशासकीय अधिकारी कायमस्वरूपी सेवेत असतात. त्यामुळे जनतेची कामे तत्काळ मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. जर अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये वेळेवर पार पाडली असती, तर आज अशा शिबिरांची गरजच भासली नसत . आदर्श ग्राम पाटोदा येथे महसूल विभाग व पंढरपूर मंडळाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून…

Read More

Ram Kadam Warns Raj Thackeray Over Deh Vikri Remark

राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून सुरू असलेल्या कथित पक्षफोडीच्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर आता त्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींची तुलना ‘देहविक्री’शी करणाऱ्या राज ठाकरे यांच्या व . राज ठाकरेंची भाजपवर सडकून टीका ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रासह…

Read More

भाजपला रोखण्यासाठी महिला पंतप्रधानांचा चेहरा द्या!:भास्कर जाधवांचे मोठे वक्तव्य, एक चेहरा दिसतोय, पण नाव सांगणार नाही!

देशातील राजकारणात भाजपला प्रभावी आव्हान द्यायचे असेल, तर विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिला पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा, असे वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. “महिला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झाला, तर देशाच्या राजकारणात मोठा चमत्कार घडू शकतो,” असे सांगत त्यांनी नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडले. चिपळूण येथे…

Read More

स्पॅम कॉल-खराब नेटवर्कसारख्या तक्रारी 15 दिवसांत निकाली काढा:अन्यथा 50 लाख दंड, TRAI ने तक्रार निवारणाचा मसुदा सादर केला

दूरसंचार नियामक ट्रायने टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी केली आहे. स्पॅम, नको असलेले, फसवणुकीचे कॉल आणि मोबाईल सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारी आता त्यांना 24×7 ऐकाव्या लागतील. तक्रारींचे निवारण करण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास कंपन्यांवर जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. या बाबी टेलिकॉम ग्राहक तक्रार निवारण (चौथी सुधारणा) विनियम-2026 च्या मसुद्याचा भाग…

Read More

इटलीमध्ये गुरुद्वाराबाहेर 2 शीख बांधवांची हत्या:नगर कीर्तनाची तयारी सुरू होती, कारमधून हल्लेखोर आले, 10 गोळ्या झाडल्या

इटलीतील कोवो येथे गुरुद्वारा साहिबबाहेर 2 शीख सेवादारांची हत्या करण्यात आली, तर एक अन्य व्यक्ती जखमी आहे. आरोपींनी त्यांच्यावर सुमारे 10 गोळ्या झाडल्या. तिघांनाही जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले, तर जखमीवर अजूनही उपचार सुरू आहेत. इटली पोलीस सध्या गोळीबाराच्या कारणांची चौकशी करत आहेत. मृतांची ओळख राजिंदर सिंग…

Read More

मेस्सी टूर आयोजकाचा बंगालच्या मंत्र्यावर खटला:4 तक्रारी दाखल केल्या, म्हटले-व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पास काळ्या बाजारात विकले होते; दिवाणी खटलाही दाखल करणार

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्याचे आयोजक सताद्रू दत्ता यांनी ४ लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यात टीएमसी नेते आणि ममता सरकारच्या माजी क्रीडा मंत्री अरूप बिस्वास यांच्या नावाचाही समावेश आहे. तक्रारीत माजी डीजीपी आणि टीएमसी राज्यसभा खासदार राजीव कुमार, कोलकाता महानगरपालिका नगरसेवक जुईन बिस्वास आणि माहिती व संस्कृती विभागाचे सचिव शांतनु बसू यांची नावे आहेत….

Read More

एक कोटींची तरतूद असूनही रस्ते पॅचिंगचा महापालिकेला विसर:मध्य अहिल्यानगर शहरासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खड्डे‎

शहरात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामे सुरू असली तरी अद्यापही मध्यशहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या निविद . मध्य शहरातील सर्जेपुरा ते भिंगारवाला चौक रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली…

Read More