गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!:पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', प्रमोद सावंत यांची घोषणा, प्रवासासाठीही आर्थिक मदत
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरमध्ये गोमंतकीय वारकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली. गोव्यातून दरवर्षी हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. मात्र,…