मनमाडमध्ये टर्फसाठी भाडेकरारास वंचित बहुजन आघाडीकडून विरोध:नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करत ठराव रद्द करण्याची मागणी
मनमाड नगरपालिकेने आययूडीपी विभागातील जागा टर्फसाठी भाडेकराराने देण्याचा घेतलेला निर्णय जनहितविरोधी असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी शहर शाखेतर्फे बुधवारी सकाळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नगरपरिषद हद्दीतील आययूडीपी साईट क्रमांक १८ मधील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी तसेच सार्वजनिक उद्यानासाठी राखीव ठेवण्याऐवजी ती खासगी वापरासाठी…