Headlines

भांडणाची व्हिडिओ शूटिंग काढल्यावरून हात्तामध्ये थरार:चाकू अन् लोखंडी रॉडने हाणामारी, 5 जण जखमी, 8 जणांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील हात्ता येथे भांडणाची शूटिंग काढण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारी मध्ये पाच जण जखमी झाली असून या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध सेनगाव पोलिसठाण्यात बुधवारी ता 24 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हात्ता येथील अनिल कांबळे व मोहन कांबळे यांच्यात बुधवारी तारीख 24 रात्रीच्या सुमारास वाद सुरू झाला. आमच्या भांडणाची व्हिडिओ…

Read More

Maharashtra: Thackeray Group Internal Conflict, Raut

महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष एकसंध ठेवावा. उबाठा गटामध्ये भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे अनेक गट निर्माण झाले असून पक्षातच अंतर्गत संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत महाविकास आ . नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आणि काँग्रेसने सुरुवातीपासून राम मंदिर उभारणीला विरोध केला, राम मंदिर…

Read More

बचतगटांमुळे महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण- गडाख:गणेशवाडीत महिला बचतगट मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद‎

बचतगटांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्याबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत होते. बचतगटातील प्रत्येक महिला दरमहा ठराविक रक्कम जमा करते. या जमा झालेल्या निधीतून गरजू महिलांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच चांगल्या प्रकारे कार्यरत असलेल्या बचत गटांना बँकांकडून विनातारण कर्जही मिळते. या कर्जाच्या माध्यमातून महिला जोडधंदे व लघुउद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात,…

Read More

'वर्दीची शपथ विसरून संघाची स्तुती…':संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची टीका

नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त (CP) विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीमुळे आणि विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि संस्थापकांची स्तुती केली. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत “ते संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरून संघाची चाटुगिरी करत आहेत,” अशी घणाघाती टीका…

Read More

शिर्डीतील रेल्वेस्थानकाचा 60 कोटींतून कायापालट:सिंहस्थ कुंभमेळ्याची चाहूल, दोन नवीन फलाट व पाच स्टेबलिंग लाइन उभारणार‎

आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने शिर्डी (साईनगर) रेल्वेस्थानकाच्या विस्ताराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणारे लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत येतात. ही संभाव्य गर्दी लक्षा . सध्या शिर्डी स्थानकावर तीन फलाट कार्यरत आहेत. नव्या योजनेअंतर्गत चार आणि पाच क्रमांकाचे दोन आधुनिक आयलँड फलाट उभारले जातील. तसेच रेल्वे गाड्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी…

Read More

पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट:बार्शी तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उन्हामुळे बाष्पीभवन वाढले, उपशासाठी दररोज दोन तास परवानगी‎

सध्या पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी बार्शी तालुक्यातील पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून, तीव्र उन्हामुळे तळ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे प्रमाण द . पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तळ्यातील पाणी दररोज केवळ दोन तास उपसा करण्याची परवानगी दिली आहे. त्यातच विजेच्या काही अडचणी…

Read More

आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिकेत अनियमितता; मंत्र्यांची विधानसभेत कबुली:दरमहा 8 लाख भाडं; विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधींचा डल्ला, दोषींवर कारवाई करा- वडेट्टीवार

अमरावती येथील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी दरमहा सुमारे 8 लाख रुपयांचे भाडे देऊन करण्यात आलेल्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करताना भाडे निश्चित करताना कोणते निकष वापरण्यात आले, कोणत्या अधिकाऱ्याच्या आयडीवरून अर्ज स्वीकारण्यात आला, संबंधित इमारत अधिकाऱ्यांच्या नावावर आहे…

Read More

नालेसफाईची पाहणी करणाऱ्यांना त्याच नाल्यात अंगठे धरून उभं केलं पाहिजे:महापौरांच्या दौऱ्यात मॅनहोल उघडेच कसे? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संदीप देशपांडे

मुंबईत पहिल्याच पावसाने पाणी साचल्याने मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईची पाहणी करण्याचे नाटक करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याच नाल्यांमध्ये अंगठे धरून उभे केले पाहिजे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. संदीप देशपांडे यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मराठी माणसांवर दादागिरी…

Read More

आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही!:ठाकरेंच्या 6 खासदारांची फूट आणि आत्रामांच्या दाव्यानंतर शरद पवारांचे बंडखोरीच्या चर्चेवर स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचेही खासदार फुटणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून विधानसभेत घमासान:बदल्यांच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आक्रमक; आशिष शेलारांनी 'सूडाच्या राजकारणा'वरून ठणकावले

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत बुधवारी चांगलाच गदारोळ झाला. ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक 2026’वर चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवला. या वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री आशिष शेलार यांनी, तुमचा सूड घेणारा अजून महाराष्ट्रात जन्माला यायचा आहे,…

Read More