Headlines

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 217 व्यवसायांची तपासणी:3 हॉटेल्स बंद, 172 अन्नपदार्थांचे नमुने घेतले; सुरक्षित, दर्जेदार अन्न नसल्याने हॉटेलवर कारवाई‎

आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने १४ जुलै २०२६ पर्यंत शहरात धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत २१७ आस्थापनांची तपासणी करून १७२ नमुने घेतले असून . अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा…

Read More

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी पत्रके, बॅनर जप्त‎:मार्क्सवादाच्या नावावर काॅ. अशोकचे पत्रक; विविध कंपन्यांसह ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत दिली धमकी‎

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली‎बुर्गी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‎कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी ‎कॉम्रेड अशोकच्या नावाची पत्रके आणि‎ एक बॅनर आढळून आले असून, यात‎ नागरिकांनी विविध कंपन्या आणि ड्रोन‎ सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करावा,‎अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,‎अशी चेतावणी देण्यात आली आहे. या‎ घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र ‎नक्षलवादी चळवळ सक्रिय होत‎ असल्याची चर्चा सुरू झाली असून,‎पोलिस…

Read More

Devendra Fadnavis New Record; Pawar Third Longest-Serving CM

राम मंदिरासाठी कारसेवा केलेल्या देवाभाऊंना शहाणपण शिकवण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. देवाभाऊंना रामरक्षा पाठ आहे तुमच्यासारखे पुस्तकात पाहून देखील रामरक्षा म्हणता येत नाही अशी त्यांची अवस्था नाही, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन उबाठाला लगावला आहे . नवनाथ बन म्हणाले की, नवनीत राणा यांनी रामरक्षा म्हणण्यासाठी परवानगी घेतली नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात…

Read More

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन:शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख; मानसिक आरोग्य चळवळीचा चेहरा पडद्याआड

मानवी मनाचे बारकावे, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मनोविकारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर काम करणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला….

Read More

उबाठाला राऊत नावाची कीड लागली,बाजूला केली नाही तर नुकसान वाढणारच:शिवराळ भाषा सर्वांना येते, पण ती कुठे वापरावी हे राऊतांना समजत नाही- नीलेश राणे

शिवराळ भाषा सर्वांना येत असते पण ती कुठे वापरली पाहिजे हे समजले पाहिजे. उबाठाला संजय राऊत नावाची कीड लागली आहे. उद्धव ठाकरे ही कीड जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत हे नुकसान अजून वाढत जाणार आहे. लोकं स्वत:हून आमच्याकडे येत असतील आणि त्यांच्यासाठी राऊत ही भाषा वापरत असतील तर उद्धव ठाकरेंचे नुकसान करत आहेत की फायदा…

Read More

बदलाची बातमी:बेंगळुरूत प्रयोग; बस-मेट्रोने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅशबॅक मिळते

के. राजू बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथील आयटी कंपनीत इंजिनिअर आहेत. खासगी वाहनाने कार्यालयात पोहोचण्यासाठी त्यांना एक-दीड तास लागायचा. सार्वजनिक वाहतुकीची आव्हाने पाहता त्यांनी कधीही यात रस दाखवला नाही. पण आता ४ महिन्यांपासून राजू पब्लिक ट्रान्सपोर्टने ऑफिसला येतात. सहकाऱ्यांशी फायद्याबद्दल बोलतात. ते बेंगळुरूतील एका प्रयोगाचा भाग आहेत. त्यात लोकांना इन्सेंटिव्ह-रिवॉर्ड देऊन पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे…

Read More

अमरावती बारावीचा निकाल 0.96 टक्क्यांनी घसरला:मुलींची आघाडी कायम, तिन्ही शाखांमध्ये अमरावतीची बाजी

अमरावती मंडळाचा बारावीचा निकाल यावर्षी ०.९६ टक्क्यांनी कमी लागला आहे. गेल्यावर्षी ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यावर्षी ही संख्या घसरून ९०.९२ टक्क्यांवर थांबली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले आणि १ लाख ३४ हजार…

Read More

अमृतसर गोल्डन टेंपलमध्ये इराणी प्रतिनिधी दाखल:खामेनेई यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले, अमेरिकेला 11व्या दिवशी हल्ल्याचा इशारा

इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधींचे उप-प्रतिनिधी डॉ. मोहम्मद हुसेन झियायेनिया आज सचखंड श्री हरमंदिर साहिब येथे पोहोचले आणि नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि SGPC अध्यक्ष ॲडव्होकेट हरजिंदर सिंग धामी तसेच श्री अकाल तख्त साहिबच्या जत्थेदार यांना दिल्लीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. डॉ. झियायेनिया यांनी सांगितले…

Read More

एकनाथ खडसे-विनोद तावडे भेटीने राजकीय चर्चांना उधाण:भाजप घरवापसीच्या चर्चांवर नाथाभाऊंचे स्पष्टीकरण

मुंबईत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची झालेली भेट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशा चर्चांना वेग आला. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे विविध अर्थ लावले जात आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांनी या…

Read More

परमेश्वराला साधेपणा, निष्कलंकपणा‎असलेला भक्त प्रिय- किशोर महाराज‎:एरंडोल येथील पायी दिंडीला 32 वर्षे पूर्ण, कन्नड येथे वारकऱ्यांचा मुक्काम ‎

अलीकडच्या काळात समाजात दिखाऊ आणि भपकेबाज भक्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, अशा बाजारू स्वरूपाच्या भक्तीने परमेश्वर प्रसन्न होत नाही. देवाला निव्वळ साधेपणा, निष्कलंकपणा आणि मनातील खरेपणा असलेला भक्तच प्रिय असतो, असे प्रतिपादन कीर्तनकार किशोर महाराज कासोदेकर यांनी केले. श्री राजे गोविंद आश्रम व गोसेवा संस्थान, एरंडोल (जळगाव) येथील पायी दिंडीला यंदा ३२ वर्षे…

Read More