जागेच्या वादातून कामगाराला मारहाण:नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा, खराडी पोलिसांकडून तपास सुरू
पुणे नगर रस्त्यावरील खराडी येथे जागेच्या वादातून एका कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कामगाराचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. खराडी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अल्ताफ अहमद शेख (वय २६, रा. खराडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजपा नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे, पंकज संजय पाटोळे,…