Headlines

अमरावती विधान परिषद निवडणूक:प्रवीण पोटेंनी घेतली रवी राणांची भेट, राणांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा मार्ग सुकर, काँग्रेस उमेदवार रुग्णालयातच

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्यातील जुना राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून दोघांमध्ये ‘मनोमिलन’ घडून आले आहे. पोटे यांनी थेट राणा यांच्या अमरावती येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणा आणि त्यांचे बंधू…

Read More

भडजीमध्ये 20 वर्षीय विवाहितेचा गळफास:खुलताबाद ठाण्यात नोंद; आत्महत्येचे कारण अस्पष्ट‎

खुलताबाद तालुक्यातील भडजी येथे एका २० वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली आत्महत्या केल्याची घटना शनिवार (९ मे) सकाळी उघडकीस आली. गायत्री आकाश वाकळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथील गायत्री हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी भडजी येथील आकाश वाकळे यांच्याशी झाला होता. वाकळे कुटुंब खुलताबाद-फुलंब्री रोडवरील भडजी गावाजवळ वास्तव्यास आहे. गायत्रीला…

Read More

ताणतणाव घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करावे:बबनराव धावणे यांचे आवाहन, इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी केला आसनांचा सराव

भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्थैर्यासाठी नियमित मेडिटेशन (ध्यान) करावे, असे आवाहन माजी क्रीडाशिक्षक बबनराव धावणे यांनी केले….

Read More

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे:प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांचे आवाहन, वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व बीएड दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी हजेरी लावली. प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत यांनी प्रास्ताविक केले. परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवू नये….

Read More

आषाढीत वारकऱ्यांची सुरक्षा ‘टॉप प्रायोरिटी':जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतला आढावा‎

आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या यात्रा कालावधीत पंढरीत येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. “पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षेसोबतच रस्ते दुरुस्ती, शौचालय सुविधा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी…

Read More

ऊसतोड मजुराचे अपहरण; चार दिवस‎ छळ, तोंडात लघुशंका करून मारहाण‎:जखमी मजुरावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू‎

उचलीचे 50 हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरून ‎ऊसतोड मजुराचे अपहरण करून त्याला 4 दिवस डांबून ‎ठेवले. या काळात त्याला बेदम मारहाण करुन छळ केला.‎ तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला ‎आहे. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करुन‎ घेतला नाही, असा आरोप आहे. देविदास कापसे‎(रा.उमापूर, ता.गेवराई) असे मारहाण झालेल्या ऊसतोड‎ मजुराचे नाव आहे,…

Read More

डिझेलसोबत पेट्रोलची लिंकींग:पेट्रोलपंप चालकांची तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यावश्‍यक सेवेसाठी इंधन देण्याच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात काही पेट्रोलपंपावर डिझेल देण्यासाठी कंपनीकडून पेट्रोलची लिंकींग केल्या जात असल्याची तक्रार काही पेट्रोलपंप चालकांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली आहे. जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवेसाठी तातडीने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्हयातील नालेगाव येथील एका गरोदर महिलेला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. केवळ इंधन नसल्याने रुग्णवाहिका…

Read More

CJP Protest Jantar Mantar | NEET Paper Leak; Demand Education Minister

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे जंतर-मंतरवर आंदोलन सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांचे समर्थक करत आहेत. त्यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले की, हजारो लोक जंतर-मंतरवर येत आहेत आणि हे आंदोलन…

Read More

विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस:तालुक्यात रक्कम वसुलीचा धाक दाखवताच अनेकांनी बुजवले खड्डे‎

सिल्लोड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील डांबरी रस्त्यांवर पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे फोडाफोडी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. या नियमबाह्य खोदकामामुळे ग्रामीण भागातील रस्ते उखडले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे . शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी विभागाने कंबर कसली आहे. रस्ते पूर्ववत न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार…

Read More

राहुरी फॅक्टरीची सानिका कोबरणे शूटिंग व्हॉलीबॉल महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी:तेलंगणातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिवनेरी क्लबच्या चार खेळाडूंची निवड‎

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत अहिल्यानगरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले. या यशाची दखल घेत राहुरी फॅक्टरी येथील ‘शिवनेरी क्लब’च्या चार खेळाडूंची ४५ व्या राष्ट्रीय शूटि . या निवडीत विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सानिका किरण कोबरणे हिची महाराष्ट्र मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिच्या या…

Read More