Headlines

Pune Entrepreneur Grievance Cell Launched; Monthly Meeting Scheduled



पुणे जिल्ह्यात उद्योजकांच्या शासकीय आणि प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष आणि मैत्री सेल सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाची पहिली बैठक झाली. या बैठकीत विवि

.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह उद्योग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कामगार, ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे आणि पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात मोठे, लघु आणि मध्यम उद्योग तसेच अनेक औद्योगिक संस्था आहेत. उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या, सुविधा आणि प्रशासकीय कामांसाठी त्यांना वारंवार पाठपुरावा करावा लागू नये, यासाठी जिल्हा स्तरावर ही समन्वय यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

बैठकीत प्रलंबित १३४ तक्रारींचा विभागानुसार आढावा घेण्यात आला. यामध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची एक, उद्योग संचालनालयाच्या दोन, ऊर्जा विभागाच्या तीन, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहा, वैधमापन शास्त्र विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संबंधित तब्बल १०९ तक्रारी आहेत. पर्यटन विभागाच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे यात दिसून आले.

मिळालेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठवून त्यांच्यावर झालेल्या कार्यवाहीचा जिल्हा स्तरावर नियमित पाठपुरावा केला जाईल. प्रकरणांच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल.

राज्य शासनाच्या मैत्री उपक्रमाप्रमाणेच हा मैत्री सेल काम करेल. या सेलद्वारे विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधला जाईल. या सेलच्या बैठका दर पंधरा दिवसांनी घेतल्या जातील.

याशिवाय, उद्योजकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विशेष बैठक होईल. या बैठकीला संबंधित औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि तक्रारीशी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील.

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही यंत्रणा ‘एक खिडकी समन्वय आणि सुविधा’ म्हणून काम करेल. उद्योगांसाठी सोपी, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासकीय व्यवस्था तयार करण्यासाठी या सुविधेचा औद्योगिक संघटनांनी सक्रियपणे वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्योग तक्रार निवारण कक्षाशी ०२०-२६१३००९७ या फोन नंबरवर किंवा collector.pune@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *