Headlines

Pune Metro Line 3 Model Display; Shiv Chhatrapati Sports Complex


पुण्यातील जोशी रेल्वे म्युझिअमने पुणे मेट्रो लाईन ३ ची प्रतिकृती तयार केली आहे. प्रवाशांना मेट्रो मार्गाची माहिती मिळावी, यासाठी हे मॉडेल म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरी मेट्रो स्टेशनवर ठेवले आहे.

.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन झाले. या मार्गाची प्रतिकृती जोशीज म्युझिअम ऑफ मिनीएचर रेल्वेजने तयार केली आहे.

जोशी रेल्वे म्युझिअमचे डॉ. रवी जोशी आणि त्यांचे पुत्र देवव्रत जोशी यांनी हे मॉडेल बनवले. देवव्रत जोशी यांनी सांगितले की, सुमारे २० फूट लांब आणि साडेसहा फूट रुंद प्लॅटफॉर्मवर ही प्रतिकृती उभारली आहे. यात मार्गावरील २३ स्टेशन दाखवली आहेत. मॉडेल १:५०० या प्रमाणात तयार केले आहे.

मेट्रोचा प्रवास दाखवण्यासाठी मॉडेलमध्ये खास एलईडी लाइटिंग वापरली आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रोचा मार्ग कसा आहे, याचा अंदाज येईल.

डॉ. रवी जोशी यांनी सांगितले की, प्रतिकृतीत गणेशखिंडमधील डबल डेकर फ्लायओव्हर, वाकड चौकातून नदी ओलांडणारा पूल आणि नदीतील पुलाचे खांब दाखवले आहेत. माण येथील मेट्रो डेपो किंवा कार शेड आणि उन्नत मार्गावरून मेट्रो खाली उतरते, तो भागही यात आहे.

याआधी जोशी रेल्वे म्युझिअमने रेल्वेच्या विविध विभागांच्या गरजेनुसार चालणारी मॉडेल्स तयार केली आहेत. पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो लाईन ३ चे मॉडेल ३० दिवसांत तयार केल्याचे जोशी पिता-पुत्रांनी सांगितले.

स्व. भाऊ जोशी यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले जोशीज म्युझिअम ऑफ मिनीएचर रेल्वेज कोथरूडमध्ये आहे. येथे जगभरातील रेल्वेंची माहिती, चालणारी मॉडेल्स आणि लाईट अँड साउंड शोमधून दिली जाते. शालेय विद्यार्थी आणि रेल्वेविषयी कुतूहल असलेले नागरिक या म्युझिअमला भेट देतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *