Headlines

Sunil Tatkare Merger Statement; Amol Mitkari Hits Back


राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा नसली तरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जर आज अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस

.

अमोल मिटकरी यांनी सुनील तटकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ज्यांनी विलिनीकरणा संदर्भात आता वक्तव्य केली, त्या लोकांची मागची वक्तव्य जर काढली तर त्याच लोकांनी म्हटले होते की विलिनीकरणाची इतकी घाई का झाली. अजितदादा तर आमच्याशी कधी बोलले नाहीत, असे ते म्हणायचे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. तसेच वैयक्तिक भडास काढायची असेल तर वैयक्तिक मत मांडा असे ते म्हणायचे, असे म्हणत मिटकरी यांनी तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाव न घेत टीका केली आहे.

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, अजितदादांनी 13 ते 14 बैठका शरद पवारांसोबत केल्या होत्या, तेव्हा अजितदादा एकटेच होते. त्यानंतर काही नेते अनेकदा वेगवेगळी स्टेटमेंट द्यायचे. वेगळ्या पद्धतीने बोलायचे. हे कशा करता? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे काही दूधखुळे नाहीत. त्यांनी त्यांचे वैयक्तिक स्टेटमेंट ठेवावे. दुसऱ्यावर भडास काढू नये, असा टोलाही मिटकरी यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.

रुग्णालयात गेल्यावर व्हिडिओ काढायची गरज नव्हती

अमोल मिटकरी म्हणाले की, कार्यकर्त्यांची भावना होती दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत. दादा असते तर विलिनीकरण झाले असते ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली, यावर मिटकरी म्हणाले की, रुग्णालयात भेटायला गेल्यावर व्हिडिओ काढायची गरज नव्हती. दहा तारखेनंतर काय होईल हे शरद पवारांना माहीत आहे. तसेच रुग्णालयात जे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची आवश्यकता नव्हती असेही मिटकरी यांनी म्हटले.

दिवाळीनंतर मोठा भूकंप होणार

तसेच दिवाळीनंतर अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात जी पत्रकार परिषद होणार आहे, त्यात सत्यता समोर येईल आणि तो मोठा भूकंप असेल असे सूचक विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे. दिवाळीनंतर रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यातून ज्यांनी कोणी हा घातपात घडवून आणला त्या संदर्भात स्पष्ट निवेदन करणार आहेत, अशी माहिती मिटकरी यांनी दिली आहे.

या संदर्भातील ही देखील बातमी वाचा..

अजित दादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र दिसल्या असत्या:सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- 12 फेब्रुवारीची तारीख निश्चित झाली होती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा नसली तरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “जर आज अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. त्यांच्या अपघाती निधनामुळे विलिनीकरणाचा हा विषय मागे पडला,” असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.