Headlines

Pune Steel Businessman Office Firing; Bishnoi Gang Link Discussed


पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी फाटा येथे एका स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एच विकास स्टील या व्यावसायिक आस्

.

सुदैवाने जीवितहानी नाही गोळीबारात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी कार्यालयाच्या गेटवर आणि परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमुळे खळबळ

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये अमूल चमारिया आणि सनी चमारिया यांचा उल्लेख करत, “अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा मार्ग स्वीकारावा लागला,” असा दावा करण्यात आला आहे. तसेच पुढील वेळी थेट डोक्यात गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे.

बिश्नोई गँगच्या नावांचा उल्लेख

व्हायरल पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि टायसन बिश्नोई यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र या पोस्टची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध आहे का, याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

शुभम लोणकर चर्चेत

तपासादरम्यान शुभम लोणकर या नावाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांड आणि सलमान खान धमकी प्रकरणात त्याचे नाव समोर आले होते. यापूर्वी अकोला पोलिसांनी त्याच्याकडून पाच पिस्तुले जप्त केली होती. प्राथमिक माहितीनुसार तो राजस्थानमध्ये सैन्य भरतीसाठी गेला असताना बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला होता.

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय!:मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मान्सून अखेर महाराष्ट्रात एकदा सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या माटुंगा, सेनापती बापट मार्ग, वांद्रे आणि वरळी सी-लिंक परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *