सिल्लोड जवळील ऐतिहासिक जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणी परिसरात एका दुर्मिळ व अत्यंत आकर्षक ‘युरोपीयन रोलर’ (European Roller) या विदेशी पाहुण्याचे दर्शन घडले आहे. ‘निसर्ग मित्र मंडळ, छत्रपती संभाजीनगर’ आयोजित निसर्ग भ्रमंती दरम्यान ज्येष्ठ पक्षीमित्र क
.
प्रमुख निसर्गप्रेमींची उपस्थिती
या मोहिमेत मंडळाचे सचिव व ‘महाराष्ट्र पक्षी मित्र संघटने’चे समन्वयक किशोर गठडी यांच्यासोबत रवींद्र देशपांडे, सौरभ पाठक, वर्षा कांडलिकर, सुनीता एरनाळे, संजय खर्चे, सविता खर्चे, शिवाजी गायकवाड, राजेश दैठणकर आणि सुभाष लाखोले आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून गडाच्या समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास केला.

दुर्मिळ दृश्य: 2 ‘युरोपीयन रोलर’ आणि 5 ‘इंडियन रोलर’ची जुगलबंदी
पक्षी निरीक्षणादरम्यान एकाच वेळी 2 युरोपीयन रोलर आणि 5 स्थानिक इंडियन रोलर (नीलकंठ) पक्षी एकत्र पाहायला मिळाले. गडद व फिकट निळ्या चमकदार रंगांचा युरोपीयन रोलर हवेतील सुरेख कसरतींसाठी ओळखला जातो. जंजाळा किल्ल्याच्या तटबंदीवरून उडणाऱ्या या पक्ष्याचे विहंगम दृश्य किशोर गठडी यांनी कॅमेऱ्यात टिपले.

हजारो किलोमीटरचा प्रवास
हा पक्षी भारतात कायमस्वरूपी न राहता ‘पॅसेज मायग्रंट’ (प्रवासी पक्षी) म्हणून येतो. मध्य आशिया आणि काश्मीरमध्ये वीण झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करताना, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान हे पक्षी भारतात विश्रांतीसाठी थांबतात.
34 पक्षीप्रजातींचे वैभव
गठडी यांनी नोंदवलेल्या 34 प्रजातींमध्ये कपाशी घार, शिक्रा, काळी घार, भारतीय धनेश, मोर, भारद्वाज, खाटीक, चंडोल, सुतार पक्षी, कोकिळा, सुगरण, ठिपकेवाली मुनिया, पिंगळा, बुलबुल आणि कोतवाल यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावेश आहे.

पर्यावरणीय दृष्टीने नोंदीचे महत्त्व
गेल्या 40 वर्षांपासून पक्षी संवर्धनात कार्यरत असलेले किशोर गठडी म्हणाले, “जंजाळासारख्या ऐतिहासिक, उंच गडावर गवताळ प्रदेश आणि दऱ्यांचे संरक्षण लाभल्याने एकाच वेळी 2 युरोपीयन रोलर व 34 प्रजाती आढळणे हे परिसराच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे.” eBird वरील या नोंदीमुळे या परिसराकडे जागतिक अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले आहे.