Headlines

Sachin Sawant Alleges MH-CET Scam; Questions 100 Percentile for Low Scores


नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आ

.

सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर जर तरुण पिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूक आहे. नीट पेपरफुटीची चौकशी सुरू असली तरी अशा प्रकारच्या चौकशीतून पुढे काहीही निष्पन्न होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. तसेच नीट सारखाच गडबड घोटाळा MH-CET परीक्षेतही झाला आहे. दहावी बारावीला जेमतेम 35-40 टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना MH-CET परीक्षेत 100 पर्सेंटाईल पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

10-12वीच्या परीक्षेत जेमतेम मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना CET मध्ये 100 टक्के पर्सेंटाईल

पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले, MH-CET परीक्षेचा अभ्यासक्रम हा 11-12 वीचा असतो, 10 वी 12 परीक्षेत जेमतेम मार्क्स मिळवलेल्या 22 विद्यार्थ्यांना MH-CET परीक्षेत मात्र 100 पर्सेंटाईल मिळालेले आहेत. ज्या विद्यार्थ्याला 10 वीच्या परीक्षेत 37 टक्के मार्क्स मिळाले त्याला MH-CET मध्ये 99.971 टक्के पर्सेंटाईल मिळाले आहेत. बारावीत ज्यांना 51 टक्के मार्क्स मिळाले अशा दोन विद्यार्थ्यंना MH-CET मध्ये 100 पर्सेंटाईल, 45 टक्के मार्क्स पडलेल्याला 100 पर्सेंटाईल आणि 39 टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला 100 पर्सेंटाईल पडलेले आहेत. बारावीला ज्या विद्यार्थ्याला 35 मार्क्स पडले त्यालाही 100 पर्सेंटाईल पडले आहेत.

MHT-CET गणितात 100 पर्सेंटाइल मिळवलेल्या रँक 1, 2, 3, 4, 5, 6, 15, 16, 17 आणि 18 या सर्व विद्यार्थ्यांचे HSC गणितातील सरासरी गुण फक्त 64.3% होते. या राज्यातील दहा अव्वल विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचे गुण या सरासरीपेक्षाही कमी होते, त्यांचे HSC गणितातील गुण अनुक्रमे 60, 54, 53, 53, 40 आणि 35 होते. CET मधील टॉप 20 रँकर्सपैकी 6 विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत 60% पेक्षाही कमी गुण मिळाले. रँक 1, 2, 5, 12, 15 आणि 18 – ज्यांचे CET पर्सेंटाइल 99.99 किंवा त्यापेक्षा जास्त आहे – यांना HSC PCM मध्ये 60% पेक्षा कमी गुण मिळाले. MH – CET परिक्षेवर नियंत्रण कोणाचे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी उत्तर द्यावे? अशी मागणी सावंत यांनी केली आहे. तसेच तसेच या परिक्षा कोण नियंत्रित करतो, या परिक्षांवर जोशी नामक व्यक्तीचा काय संबंध आहे, याचाही खुलासा केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, CET गणितात 100 पर्सेंटाइल मिळवून राज्यातील टॉप 20 मध्ये स्थान मिळवणाऱ्या एका गुणवंत विद्यार्थ्याला बारावी बोर्डाच्या पीसीएम (PCM) ग्रुपमध्ये अवघे 39 टक्के गुण मिळाल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे, तर सीईटी गणितात परफेक्ट 100 पर्सेंटाइल मिळवणाऱ्या टॉप 20 मधील तब्बल 10 विद्यार्थ्यांच्या बारावी गणितातील गुणांमध्ये 35 ते 97 अशी तब्बल 62 गुणांची प्रचंड तफावत पाहायला मिळत आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याला सीईटी गणितात पूर्ण 100 पर्सेंटाइल असूनही बारावी गणितात केवळ 35 टक्के गुण मिळाल्याने दोन्ही परीक्षांच्या गुणांमधील हे 65 गुणांचे मोठे अंतर सध्या शिक्षण क्षेत्रात आश्चर्य आणि तीव्र चर्चेचा विषय ठरत आहे.

घोटाळ्यातील लोकांचे संबध भाजपा नेत्यांशी असल्याचे उघड

सचिन सावंत पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परिक्षा पे चर्चा’मध्ये दरवर्षी मोठे प्रवचन देत असतात पण त्यांच्याच कार्यकाळात ‘व्यापम’ सारखे परिक्षा घोटाळे फोफावत आहेत ही चिंतेची बाब आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या राज्यातच परिक्षेत गडबड घोटाळे वाढले आहेत. त्या घोटाळ्यातील लोकांचे संबध भाजपा नेत्यांशी असल्याचे उघड झाले आहेत. MH-CET च्या परिक्षेतील घोटाळ्यावर मी एक्स या सोशल मीडियावरून एक पोस्ट केली होती, त्यावर या परिक्षा घेणाऱ्या सेलकडून यादी अस्पष्ट आहे असा खुलासा करण्यात आला आहे. या यादीतीला विद्यार्थ्यांची नावे सार्वजनिक होऊ नयेत म्हणून ती झाकण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका

आता मी पुन्हा एमएच सीईटी कमिशनला एक यादी आणि पत्र देणार आहे, त्यावर त्यांनी खुलासा करावा. एमएचसीईट परिक्षा सेलमध्ये मागील 8-10 वर्षे तेच अधिकारी काम करत असून त्यांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. नीट, एमएच-सीईट सारख्या परिक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्य ठरवणाऱ्या असतात त्यात अशा प्रकारे घोटाळे करून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *