Headlines

Supriya Sule Slams Amit Shah Over NEET Paper Leak


नीट पेपरफुटी प्रकरण आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज देशातील नवीन पिढी अस्वस्थ असून ही अत्यंत काळजीची ग

.

‘UPSC चे पेपर फुटत नाहीत, मग NEET चे का फुटतात?’

संसदेत आपण या विषयावर आवाज उठवला असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “आज भारताचे शिक्षण नेमके कसे असावे, यावर देशात सखोल चर्चेची गरज आहे. जगभरात परीक्षा होतात, पण आपल्याकडेच असे पेपर का फुटतात? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) पेपर कधीही फुटत नाहीत, मग फक्त ‘नीट’चेच (NEET) पेपर कसे फुटताहेत?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला.

‘शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे’

शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणावरही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “सध्या देशात शिक्षणाचे पूर्णपणे बाजारीकरण झाले आहे. अनेक खाजगी कोचिंग क्लासेस एवढे गब्बर झाले आहेत की ते आता शेअर मार्केटमध्ये स्वतःचे ‘आयपीओ’ (IPO) आणत आहेत. हे थांबले पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबला पाहिजे,” असे सुळे यांनी स्पष्ट केले.

‘पुण्यातील आंदोलन हे पुणेकरांचे’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याला काँग्रेसकडून तीव्र विरोध दर्शवत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अमित शहांच्या दौऱ्याला जो विरोध होत आहे, ते आंदोलन केवळ काँग्रेस पक्षाचे राहिलेले नाही, तर तो तमाम पुणेकरांचा संताप आहे. हे पुणेकरांचे आंदोलन आहे.”

हेही वाचा..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज पुणे दौरा:काँग्रेस-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता, शहराला छावणीचे स्वरूप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतील. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा

पुण्यात आर्मी का बोलावली, एवढे का घाबरताय शहा?: संजय राऊतांची अमित शहांवर टीका, 2029 पूर्वीच मोदी-शहा सत्तेतून जाणार असल्याचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याकडे पाठ फिरवून अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यात आले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीला गृहखातेच जबाबदार असून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.