Headlines

Uddhav Thackeray Shivaji Park Protest; Mumbai Police Files 3 Cases


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलनाच्या आयोजनात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्

.

हे आंदोलन पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आयोजित करण्यात आले होते. सभेनंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि आंदोलक मैदानातच थांबल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली.

कोणत्या कारणांमुळे तीन गुन्हे दाखल?

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये तीन वेगवेगळ्या कारणांचा समावेश आहे. पहिला गुन्हा विनापरवानगी सभा आणि आंदोलनाचे आयोजन केल्याप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. दुसरा गुन्हा अधिकृत परवानगी नसतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांना आंदोलनस्थळी जमण्याचे आवाहन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे.

तिसरा गुन्हा सभेनंतरही दादर परिसरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू राहिल्याने आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाल्याने दाखल करण्यात आला आहे. आंदोलनामुळे दादर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

गर्दीमुळे पोलिसांची धावपळ

शिवाजी पार्कावरील सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सभा संपल्यानंतरही अनेक आंदोलक मैदान रिकामे करण्यास तयार नसल्याने पोलिसांनी वारंवार आवाहन केले. परिस्थिती हाताळण्यासाठी दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले.

उद्धव ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी दाखवते, मग सोनम वांगचुक यांच्याशी संवाद का साधू शकत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच त्यांनी सरकारवर बेरोजगारी, शिक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, “हे सरकार रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही. त्यामुळे हे सरकार बदललेच पाहिजे. कार्यकर्त्यांनी आता नेतृत्वाची जबाबदारी घ्यावी,” असे आवाहन केले.

सोनम वांगचुक यांच्या कार्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “लडाखमध्ये पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून कृत्रिम हिमनद्या तयार करणारे आणि सीमावर्ती भागातील सैनिकांसाठी सौरऊर्जेवर आधारित सुविधा उभारणारे सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे.”

दरम्यान, या आंदोलनाप्रकरणी नोंदवलेल्या तीन गुन्ह्यांबाबत पुढील तपास शिवाजी पार्क पोलीस करत असून, तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

संबंधित बातमी वाचा…

‘हे सरकार या आगीत भस्म झाले पाहिजे’:आझाद मैदानातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, अभिजित दीपके यांच्या लढ्यालाही पाठिंबा

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून प्रकृती खालावल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जागी आता दिल्लीच्या आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले असून त्यांना दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत आहे. याच आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतही माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत एका आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी वांगचूक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देत ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली, तसेच ‘हे सरकार आता घालवले पाहिजे’, असा घणाघातही त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.