![]()
कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भगवान नृसिंह जन्मोत्सवानिमित्त वार्षिक सोंगाच्या पंचमी उत्सवाची मेढ पूजन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १९ रोजी झाले. शिवसेना उपतालुकाप्रमुख गोकुळ गोरे, ग्रामपंचायत सदस्य ललित सुराशे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचाल
.
पाच दिवसांत सुरुवात विदूषक, गणपती, सरस्वतीच्या सोंगाने होते. राम-लक्ष्मण, वेताळ, बाळंतीण, रेणुकामाता, कालिकामाता, शंकर-पार्वती, संतोषीमाता, रावण, वानर ताटी, खंडोबा, वीरभद्र, तुळजाभवानी, पाटणा देवी अशी विविध देवतांची मुखवटे, वेशभूषा परिधान करून घंटानादावर सोंगे काढली जातात. नृसिंह जयंती पर्वावर गुरुवार, ३० एप्रिल रोजी पहाटे नृसिंह महाराजांचे सोंग काढून उत्सवाची सांगता होते.