Headlines

प्रशांत महासागरातील एल निनो यंदा आपल्या नळाचे 15% पाणी पळवणार:ऑगस्टअखेरपर्यंत पावसाच्या खंडाची चिन्हे म्हणून सर्व शहरांत 15% पाणी कपात करा




राज्यावर यंदा ‘एल निनो’चे संकट घोंगावत आहे. जूनमध्ये हजेरी लावून पावसाला ऑगस्टपर्यंत खंड पडू शकतो, अशी चिन्हे आहेत. म्हणून सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच मनपांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी 15% पाणी कपातीच्या सूचना दिल्या आहेत. ‘एल निनो’चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर होऊ शकतो. त्या दृष्टीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून उपाययोजना सुरू झाल्या आहेत. एल निनो म्हणजे काय? प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते या स्थितीला ‘एल निनो’ म्हणतात. यामुळे जागतिक तापमानात वाढ होते व उन्हाळा तीव्र जाणवतो. एल निनोचा परिणाम काय? पावसाचे ढग भारताऐवजी दक्षिण अमेरिकेकडे वळतात. भारतात मान्सूनचा पाऊस कमी पडू शकतो. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. दर पाच-सात वर्षांनी अशी परिस्थिती येते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारच्या उपयोजना काय? पहिल्यांदाच राज्याच्या अर्थसंकल्पात एल निनोचा उल्लेख झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर जलसंकटाशी मुकाबल्याची सूचना केली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे विभागीय बैठकांमधून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपाययोजना करत आहेत. धरणांची स्थिती (उपयुक्त साठा 21 एप्रिलचा)
प्रकल्प आजचा साठा गेल्या वर्षीचा साठा
जायकवाडी 1190.40 (54.83%) 975.43 (44.93)
मांजरा 92.64 (52.35%) 61.39 (34.69%)
माजलगाव 160.34 (51.50%) 62.20 (19.98%)
निम्न तेरणा 66.40 (72.79%) 51.69 (56.67%)
येलदरी 527.30 (65.12%) 463.94 (57.29%) 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत अडथळा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2028 ते 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या आखातातील युद्धापाठोपाठ एल निनोच्या संकटामुळे हे उद्दिष्ट गाठण्यात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, असे दिसू लागले आहे. 7 पिकांच्या उत्पादनात 30 ते 50% घट शक्य पीक योग्य पेरणी अंतिम 15 दिवस उशिरा 30 दिवस उशिरा
कालावधी तारीख उत्पादन घट उत्पादन घट
कापूस/ 15 जून 10 जुलै 10 ते 25% 30 ते 50% सोयाबीन ते 5 जुलै
ज्वारी,तीळ 15 जुन 7 जुलै 20 जुलै 25% 30%
उडीद,मूग 15 जुन 7 जुलै 15 जुलै 30 % 70 ते 90%
मका 10 जून-10 जुलै 20 जुलै 10 ते 20% 40 % जून: 304 तालुक्यांत 75%पेक्षा कमी पाऊस 2023 मध्ये जूनमध्ये राज्यभर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जूनमध्ये 358 पैकी 304 तालुक्यात मासिक सरासरीच्या तुलनेत 75 टक्क्यांपेक्षा कमी तर 29 तालुक्यात 75 ते 100 %दरम्यान आणि 22 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला होता. ऑगस्ट महिन्यात 344 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा कमी, 9 तालुक्यात 75 ते 100 टक्के, तर 2 तालुक्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला होता. सोलापूरला गारपीट, नवी मुंबईतही पाऊस सोलापूर शहरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मात्र शहरात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. विविध भागात गारांचा पाऊस बरसला. दिवसभरातील झळांनी त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना सायंकाळी मात्र चांगलाच दिलासा मिळाला. नवी मुंबई, बदलापूर परिसरात मंगळवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, पुढील 4 दिवस सोलापूरला वादळी तर राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर तसेच अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी तर मराठवाड्यातील इतर जिल्हे, कोकणात काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. धाराशिवला शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी बबन गोविंद लांडगे (55)हे मंगळवारी दुपारी शेतात कुटुंबीयांसह कडब्याची गंजी लावत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. त्यांना धाराशिव येथील वैद्यकीय रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *