![]()
भोंदूबाबा अशोक खरातने उरणमधील चाणजे येथे अस्मिता म्हात्रे व कैलास शहा यांच्याकडून पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर १२ मार्च रोजी ५८ लाख ५० हजार रुपयांचा खरेदी व्यवहार झाला. धक्कादायक बाब म्हणजे, १७ मार्च रोजी ज्या दिवशी खरातला अटक झाली, त्याच दिवशी तलाठी सजा चाणजे यांनी या व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध केली. खरात कोठडीत असतानाही यंत्रणा थांबली नाही. अवघ्या एका महिन्यात १३ एप्रिल रोजी फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर करून महसूल नोंद पूर्ण करण्यात आली. दरम्यान, खरातला पाचव्या गुन्ह्यात ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.सहाव्या गुन्ह्यात त्याला शुक्रवारी पुन्हा हजर केले जाईल. शिर्डीत हॉटेल व्यावसायिकावर ईडीचे छापे शिर्डी | भोंदू अशोक खरात यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी शिर्डीतील तारांकित हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेल व कोपरगाव येथील निवासस्थानी छापे टाकले. खरात कनेक्शन उघड झाल्याने समता पतसंस्थेचे संस्थापक ओमप्रकाश ऊर्फ काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक गजाआड सिन्नर | सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा माता ग्रामीण पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश वामन कांडेकरला सिन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पतसंस्थेत बनावट खाती उघडून आर्थिक व्यवहार खरातने केले होते. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस ३२ संशयास्पद खात्यांची माहिती घेताय. जमिनीचे मूल्य ४ कोटींवर राज्य सरकार व सिडकोद्वारे उरण परिसरात ‘तिसरी मुंबई’ वसवली जात आहे. या प्रकल्पांतर्गत जमीनमालकांना २२.५% विकसित भूखंड मिळणार आहे. खरातने याच नफ्यासाठी चाणजे व द्रोणागिरी नोडमध्ये मोठी गुंतवणूक केली. यामध्ये ही जागा अवघ्या ५८ लाखांना खरेदी झाली असली तरी, बाजारभावानुसार ही जमीन ३ ते ४ कोटींची आहे. भूसंपादन झाल्यास तिप्पट जास्त दर मिळेल.
Source link