![]()
राज्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले असून राजकीय गणितांची जुळवाजुळव वेगवान झाली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची दाट शक्यता असून काँग्रेस-राष्ट्रवादीने (शप) त्यांना हिरवा कंदील दिला आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच सुटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपापल्या पक्षांतील निष्ठावंतांचे पुनर्वसन आणि “सोशल इंजिनिअरिंग’ साधण्यासाठी आक्रमक रणनीती आखत आहेत. भाजपचे “कर्तृत्व आणि निष्ठेला’ प्राधान्य ही विधान परिषद निवडणूक केवळ वरिष्ठ सभागृहातील जागा भरण्यासाठी नसून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली “व्होट बँक’ सुरक्षित करण्याची मोठी संधी आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीमुळे मविआमध्ये नेतृत्वाचा पेच सुटल्याचे चित्र आहे, तर महायुतीत मित्रपक्षांना सोबत घेतानाच अंतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. भाजप या वेळी कर्तृत्व आणि निष्ठेला प्राधान्य देणार असून माजी आमदार सुनील राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणूक १२ मे रोजी होईल. उपमुख्यमंत्र्यांची ‘फील्डिंग’; शिंदेंच्या शिवसेनेचा मास्टर प्लॅन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाट्याला येणाऱ्या जागांवर कुणाची वर्णी लागणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.
शीतल म्हात्रे: आक्रमक प्रवक्त्या
म्हणून महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे.
शायना एनसी: भाजपमधून शिवसेनेत आलेल्या शायना एनसी यांच्या माध्यमातून उच्चभ्रू आणि महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असू शकतो.
राहुल शेवाळे: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शिंदे त्यांना विधान परिषदेवर पाठवून सक्रिय ठेवण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल इंजिनिअरिंग करण्यावर भाजप देणार भर भाजप प्रादेशिक व जातीय समतोल साधण्यासाठी या नावांवर विचार करत आहे
मनोज कोटक : मुंबईतील गुजराती मतांचे समीकरण साधण्यासाठी.
अतुल काळसेकर : कोकणातील मराठा चेहरा आणि संघटन मजबुतीसाठी.
संजय केणेकर: मराठवाड्यातील ओबीसी चेहरा; अपूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी.
नवनीत राणा: विदर्भातील आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा आणि दलित मतांचे समीकरण.
डॉ. राजेंद्र फडके: उत्तर महाराष्ट्रातील स्वच्छ प्रतिमा आणि संघातील अनुभव.
माधवी नाईक: महिला आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून चर्चेतील नाव.
Source link
ठाकरेंच्या एन्ट्रीने मविआला बळ:तर भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी, विधान परिषदेसाठी राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू