Headlines

अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 40 टक्क्यांनी घटला:उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचे संकट, शेती व उद्योगाच्या आरक्षणावर टांगती तलवार




अमरावती जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा यावर्षी ४०.५२ टक्क्यांनी घटला आहे. यामुळे आगामी उन्हाळ्यात अमरावतीसह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाणीसाठा कमी झाल्याने शेती आणि उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या आरक्षणावर फेरविचार करावा लागणार आहे. जलसंपदा विभागाने महसूल विभागासोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. अप्पर वर्धा धरण अमरावती, बडनेरा, मोर्शी आणि परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरवते. तसेच हजारो हेक्टर शेती आणि एमआयडीसी उद्योगांसाठी सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने यंदा धरणात केवळ ५८.६६ टक्के पाणीसाठा आहे, जो गतवर्षी ९९.१८ टक्के होता. गतवर्षी धरणात ५५९.४१ दलघमी पाणी होते, तर यावर्षी ते ३३०.८५ दलघमीवर आले आहे. म्हणजेच २२८.५६ दलघमी पाणी कमी झाले आहे. नियमानुसार, उपलब्ध साठ्यातून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. यामुळे अमरावतीकरांना पाणी कपातीची भीती वाटत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *