Headlines

विधान परिषद निवडणुकीसाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज दाखल केले:माजी आमदार देशपांडे यांनी शिवसेना आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले; उद्या सुटी




अमरावती प्रतिनिधी: विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी, १ सप्टेंबर रोजी दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले. माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले. किरण अर्जुन चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. शिवसेनेने अद्याप अधिकृत उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच नावाची घोषणा करतील, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. मावळते आमदार किरण सरनाईक यांनीही शिवसेनेच्या उमेदवारीवर दावा केला आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस होता. पहिल्या दोन दिवसांत ८४ अर्जांची उचल झाली, पण कुणी अर्ज भरला नव्हता. आज ११ उमेदवारांसाठी २१ नवीन अर्जांची उचल झाली, त्यामुळे आतापर्यंत एकूण १०५ अर्जांची उचल झाली आहे. शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी-शास्त्री जयंतीमुळे निवडणूक विभागाला सुटी राहील. निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *