Headlines

भातकुलीत जलजीवन मिशनचे जलकुंभ शोभेचे बाहुले:दोन वर्षांपासून पाईपलाईन नाही, अनेक गावांना 4 ते 6 दिवसांनी पाणी




अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि खारपाण पट्ट्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. जलजीवन मिशन योजनेचे नियोजन कोलमडले असून, नागरिकांना ४ ते ६ दिवसांनी अपुरे आणि खारट पाणी मिळते. दोन वर्षांपूर्वी बांधलेले जलकुंभ पाईपलाईनअभावी कोरडेच आहेत. अमरावती जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. भातकुली तालुक्यातील आसरा, टाकळीखेडा शंभा, वाठोडा शुक्‍लेश्वरसह अनेक गावांमध्ये जलकुंभ तयार होऊन दोन वर्षे झाली, पण पाईपलाईन पोहोचली नाही. यामुळे आसरा, सायत, ऋणमोचन, नांदेड येथे ५ ते ७ दिवसांनी पाणी येते. इतर गावांना ४ ते ६ दिवसांनी खारे मिश्रित पाणी मिळते. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे प्रत्यक्ष कामे सुरू करण्याची मागणी केली. सप्टेंबरमध्येच २० ते २५ गावांमध्ये ही परिस्थिती असल्याने, येत्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होण्याची भीती आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *