![]()
अमरावती येथे झालेल्या आयटकच्या जिल्हा अधिवेशनात राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे यांनी कामगारांना संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन केले. चार श्रमसंहिता आणि केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात एकजूट मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हे अधिवेशन रेल्वे स्टेशनसमोरील उर्जाभवन येथे कॉम्रेड जे. एम. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. भाकपचे जिल्हा सचिव कॉ. सुनील मेटकर व लिलेश्वर बनसोड यांनी मार्गदर्शन केले. आयटकचे जिल्हा सचिव कॉ. निळकंठ ढोके यांनी मागील तीन वर्षातील कामकाजाचा अहवाल व आगामी कृती कार्यक्रम सादर केला. कामगार-कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक ठराव मंजूर झाले. येत्या ३ व ४ ऑक्टोबरला नागपूर येथे आयटकचे राज्य अधिवेशन होईल. या निमित्ताने निघणाऱ्या संविधान विचार रॅलीत जिल्ह्यातील कर्मचारी-कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला. अंगणवाडी, आशा, एमएसई वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार, घरकाम मोलकरीण, कंत्राटी नर्सेस, शेतमजूर, सफाई कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन जिल्हा कौन्सिलही गठीत करण्यात आली.
Source link
आयटकचे श्याम काळे यांचे कामगारांना संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन:केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन.