![]()
पाटण तालुक्यातील कोयना भागातील वाघणे येथे शेतात गेलेल्या 50 वर्षीय शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या हल्ल्यात आनंद हरी बल्लाळ यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आनंद बल्लाळ हे दुपारी वाघणे येथील शेतात गेले होते. यावेळी अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना पाटण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर वाघणे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने परिसरात पाहणी करून अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
Source link
अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी:वाघणे परिसरातील घटना; प्राथमिक उपचारानंतर पाटणला हलविले