Headlines

अहिल्यानगरमध्ये आईसह दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने शोककळा:पती घरी परतल्यानंतर उघडकीस आली घटना




देवळाली प्रवरा येथील कारवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी एकाच कुटुंबातील आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. वंदना गणेश गाडे तसेच त्यांची मुले जीवन गणेश गाडे (वय ४) आणि चैतन्य गणेश गाडे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. गणेश गाडे हे सेंट्रिंगच्या कामासाठी सोमवारी सकाळी घराबाहेर गेले होते. चैतन्य हा काही काळ आत्याकडे शिक्षणासाठी राहत होता. सोमवारी सकाळीच तो आईकडे घरी आला होता. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास गणेश गाडे घरी परतले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी बराच वेळ दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यानंतर पत्नी आणि दोन्ही मुले मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल गणेश लिपणे, सुरज गायकवाड आणि राहुल यादव यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. घटनेने कारवाडी परिसरात शोककळा पसरली. पोलिस तपासातून या दुर्दैवी घटनेमागील कारण समोर येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *