![]()
राज्यातील महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरून सातत्याने आक्रमक हल्ले चढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा आमदार रोहित पवार यांनी आता राज्य सरकारवर एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केला आहे. ‘सरकारविरुद्धची माझी आक्रमक भूमिका मवाळ व्हावी, यासाठी प्रेशर टॅक्टिक्स (दबावतंत्र) म्हणून आता माझ्या व्यवसायाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली जात आहे,’ असा दावा रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारला उघडे पाडत असल्याने धसका रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, ते सातत्याने सरकारला विविध मुद्द्यांवर कोंडीत पकडत आहेत. त्यांनी लिहिले आहे, “शेतकरी कर्जमाफी, कांदा खरेदी, MPSC आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, CET सेलमधील आणि कुंभमेळ्यातील विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर मी सरकारला घेरण्याचं काम करतोय. सध्याही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध विभागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि सामान्य कुटुंबात दिवाळी साजरी करून त्यांना आधार देतानाच, सरकारलाही उघडं पाडतोय. त्यामुळे या खुनशी सरकारने याचा चांगलाच धसका घेतला आहे.” व्यवसायाला लक्ष्य करण्याचे ‘प्रेशर टॅक्टिक्स’ सरकारच्या संभाव्य कारवाईबाबत थेट इशारा देताना रोहित पवार म्हणाले, “सरकारबाबतची माझी ही आक्रमक भूमिका मवाळ व्हावी, यासाठी प्रेशर टॅक्टिक्स म्हणून त्यांनी माझ्या व्यवसायाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे मला कळतेय. याबाबतची खास रणनीती आखण्यात येत असून, पुढील काही दिवसांत अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात एक बैठकही घेतली जाणार आहे.” ‘कोण पुढाकार घेतंय, याची माहिती आमच्याकडे आहे’ रोहित पवार यांनी या कटामागील सूत्रधारांनाही थेट इशारा दिला आहे. “माझ्या व्यवसायाला लक्ष्य करण्यासाठी कोण पुढाकार घेतंय, याचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचतेय. आता सरकारमधील नेते काय निर्णय घेतात आणि त्याला कोण कोण पाठिंबा देतात, याकडे आमचे बारकाईने लक्ष आहे,” असा इशारा त्यांनी दिला आहे. ————– हेही वाचा.. कोल्हापूरनंतर आता राजू शेट्टींचा मोर्चा सोलापूरकडे!: रविवारी पंढरपुरातून ठरवणार ऊस आंदोलनाची पुढील दिशा, शेतकऱ्यांनो सावध राहा, शेट्टींचे आवाहन कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ऊस दराच्या मुद्द्यावरून आक्रमक आंदोलन केल्यानंतर, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला असून, येथील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी ते रविवारी पंढरपूरमधून आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत. सविस्तर वाचा
Source link
आक्रमक भूमिका मवाळ व्हावी म्हणून सरकार माझ्या व्यवसायाला लक्ष्य करतंय:रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले- खुनशी सरकारने धसका घेतलाय