Headlines

आखतवाडेच्या रेशनप्रश्नी सरपंच परिषद मैदानात:आज तहसील कार्यालयावर धडक‎, निर्णय न घेतल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा‎




गावकऱ्यांनी पुरावे देऊन रद्द केलेला रेशन दुकानदाराचा परवाना पुन्हा सुरू झाल्याने आखतवाडे येथे साखळी उपोषण सुरू असून, या आंदोलनाला बागलाण तालुका सरपंच परिषद व सरपंच संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, या मागणीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. एका व्यक्तीच्या गैरप्रकाराचा फटका संपूर्ण गावाला बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हक्काच्या { उर्वरित पान. २ तालुका प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सरपंच परिषदेने दिला आहे. सोमवारी (दि. ५) सरपंच परिषदेच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन निवेदन देण्यात येणार आहे. ^गावकऱ्यांनी पुरावे देऊन रद्द केलेला रेशन परवाना पुन्हा सुरू होणे हा प्रशासनाचा बोगस कारभार आहे. जनता न्यायासाठी उपोषणाला बसली असताना दोषींवर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घातले जाते. – सरपंच परिषद, बागलाण तालुका



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *