Headlines

आम्हाला काही लोकांवर शंका, भाजपच्या पाठिंब्याशिवाय काहीच होऊ शकत नाही:न्यायालयाचा निकालही सत्ताधारीच ठरवतात का? देशात भयंकर हुकूमशाही सुरू- अंबादास दानवे




ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे आमचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. आम्हाला काही लोकांबद्दल शंका आहे, असे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर नागेश पाटील आष्टीकर हे स्वत: उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. कोणी काही सांगत आहेत, त्यांची सत्यता काय आहे देव जाणे. अंबादास दानवे म्हणाले की, कोणाला किती रक्कम देण्यात आली हे संपर्कातून बाहेर येतेच. न्यायालयाचा निकाल सुद्धा सत्ताधारी पक्ष ठरवतात की काय असे राऊतांच्या बोलण्यातून समोर येत आहे. न्यायालयाचा निकाल जर नेते ठरवत असतील तर हुकुमशाहीचा प्रकार आहे. भाजपच्या पाठिंब्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. शिंदेंना खासदारांशी काय करायचे आहे? त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे.
मला काही ऑफर नाही अंबादास दानवे म्हणाले की, मला काही ऑफर आली नाही. पक्षाने लोकांवर अतिविश्वास ठेवला. पण सत्ताधाऱ्यांनी कितीही लोकांना सोबत घेतले तरी मतदार आमच्यासोबत आहे. लोकप्रतिनिधी गेले म्हणून संघटना संपली असे होत नाही. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर अशा बातम्या सुरू आहेत, हे कसे काय शक्य आहे. कोणत्या आमदारांनी आम्हाला सोडले असे म्हणता येणार नाही. यंत्रणेच्या जीवावर सर्व काही सुरू अंबादास दानवे म्हणाले की, शिंदे गटाकडे पैसाशिवाय दुसरा कोणताही विचार त्यांच्याकडे नाही. हे आपण मान्य केले पाहिजे. सरकारकडून आमदार-खासदार फोडण्यासाठी कोट्यावधी रुपये दिले जातात, त्यांच्याकडे यंत्रणा बघत नाहीत. पण कुठे 10 ते 15 लाखांचा विषय असेल तर यंत्रणा तिकडे लक्ष देते, अशी परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली आहे. शिरसाट संघटनेच्या बळावर निवडून आले अंबादास दानवे म्हणाले की, स्वत:चे काही श्रम नसताना राखीव मतदारसंघातून 3 वेळेस पक्षाच्या बळावर निवडून आलेला माणूस जो 4 पावलं सुद्धा प्रचारासाठी चालत नाही, त्याने पक्षाच्या विरोधात असे वक्तव्य करणे याला नमकहरामीशिवाय दुसरा कोणता शब्दच असू शकत नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी अप्रत्यक्ष संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *