Headlines

मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार:राजाभाऊ वाजेंचा फुटीच्या चर्चांना पूर्णविराम, म्हणाले- एकनाथ शिंदेंचा एकही कॉल आला नाही




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. मी पक्ष सोडणार नाही, मी पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहणार, अशा कडक शब्दांत वाजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मला कोणाचाही फोन नाही, मी पक्षात नाराज नाही माध्यमांशी संवाद साधताना राजाभाऊ वाजे म्हणाले की, माझा इतर कोणाशीही संपर्क झालेला नाही. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटातील कोणाचाही फोन आलेला नाही, ना मला कोणती ऑफर देण्यात आली आहे. मी पक्षात अजिबात नाराज नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आलोय आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही तोडणार नाही. इतर खासदारांबाबत विचारले असता, मी इतर कोणाबद्दलही बोलू शकत नाही, पण मी स्वतः ठाकरेंसोबत ठाम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे भावुक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील फुटीच्या चर्चांदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राजाभाऊ वाजे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. १४ जून रोजी झालेल्या खासदारांच्या बैठकीचाही उल्लेख वाजे यांनी १४ जून रोजी झालेल्या खासदारांच्या बैठकीचाही उल्लेख केला. “त्या बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर पाच खासदार ऑनलाइन सहभागी झाले होते. पक्षात कोणतीही नाराजी नाही,” असे सांगत त्यांनी फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “मी कार्यकर्ता म्हणून पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि कुठेही जाणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षातील कुणीही अधिकृतपणे जाण्याची भूमिका मांडली नाही- सावंत खासदार अरविंद सावंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत बोलताना सावंत म्हणाले की, संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठी मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. आतापर्यंत आमच्या पक्षातील एकाही खासदाराने किंवा नेत्याने पक्ष सोडत असल्याचे आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या खासदारांच्या फुटीच्या चर्चांवर सावंत यांनी थेट भाष्य करत, पक्षातील कुणीही अधिकृतपणे जाण्याची भूमिका मांडलेली नसल्याचे स्पष्ट केले. ऑपरेशन टायगर सोपं नाही: शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून दिले, आता बेईमानी केली तर जनता सोडणार नाही; संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरी करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. हा लोकशाहीचा केलेला तमाशा असून आता पुन्हा जर कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असे नेत्यांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरी करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. हा लोकशाहीचा केलेला तमाशा असून आता पुन्हा जर कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असे नेत्यांनी ठणकावून सांगितले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *