Headlines

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांचा वाद चिघळला:‘गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार- जैनमुनी नीलेशचंद्र




मुंबईत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी जैन मुनींसाठी अनेक सोसायट्यांत तसेच फूटपाथवर पांढरे पट्टे रंगवले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू नीलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यांनी ‘आता गांधींची गांधीगिरी नाही, तर गोडसेंची गोळी चालणार’, असे विधान केले आहे. यावर कॉंग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेसने नीलेशचंद्र यांचा व्हिडिओ ट्विट करत म्हटले, हे नीलेशचंद्र स्वतःला ‘जैन धर्मगुरू’ म्हणवून घेतात, पण प्रत्यक्षात समाजात विष कालवणारी आणि हिंसेचे समर्थन करणारी चिथावणीखोर भाषणं ठोकतात. अहिंसेचा मार्ग दाखवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अनादर करण्याची यांची लायकी काय? आणि ज्याने या अहिंसेच्या साधकावर गोळी झाडली, त्याचे जाहीर कौतुक करतात? कसली विकृती आहे ही’, अशी टीका केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *