Headlines

आवाजाच्या मर्यादेची एक वेळा चेतावणी; दुसऱ्यांदा डीजे जप्त:पोलिस अधीक्षक चांडक यांचा इशारा, 800 तडीपार केले तडीपार‎




सण-उत्सवाच्या पृष्ठभूमीवर राधा मंगलम येथे मूर्तिजापूर उपविभागाच्या आयोजित शांतता समितीची बैठक पार पडली. उत्सवात दोन टॉप, एक बेस अशा प्रकारे डीजे वाजवू शकता. परंतु आवाजाची मर्यादा ठेवणे बंधनकारक आहे. आवाजाची मर्यादा ओलांडली तर एकदा पोलिस चेतावणी देतील. परंतु दुसऱ्या वेळेस डीजे जप्त केला जाईल. गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी बैठकीत स्पष्ट केले. व्यासपीठावर बैठकीचे अध्यक्ष म्हणून आमदार हरीश पिंपळे यांची उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गटविकास अधिकारी मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे, निवासी तहसीलदार लोखंडे, महावितरणचे उपविभागीय अभियंता बजाज, नगराध्यक्ष हर्षल साबळे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बजाज आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीला शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी, बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार वानखेडे, माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकर, बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार, परिवेक्षाधीन पोलिस उपविभागीय अधिकारी कांदे, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार महाडिक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी यांनी केले. आभार पोलिस उपनिरीक्षक मानकर यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला. सण-उत्सव साजरे होत असताना सर्वच नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शिस्त पाळा. कायद्याच्या चौकटीत सण साजरे करा. कुठलीही त्रासदायक स्थिती निर्माण होणार नाही. इतरांना त्रास होणार नाही. याची काळजी गणेश भक्तांनी आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. गणेश मिरवणुकीच्या मार्गात कुठलाही बदल होणार नाही. मूर्तिजापूर हे शांत शहर आहे. येथील सर्वांनी पोलिस विभागाला सहकार्य करावे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डीजे वाजवताना आवाजाची मर्यादा पाळावी. प्रत्येक मंडळाकडे एक दत्तक अंमलदार देण्यात येणार आहे. त्यामार्फत मंडळाच्या समस्या सोडवण्यास मदत होईल. आतापर्यंत गुन्हेगारी वृत्तीच्या ८०० लोकांना तडीपार करण्यात आले आहे, असेही एसपी चांडक यांनी सांगितले. कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरा करा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *