![]()
घरासमोरील पटांगणात झोपलेल्या २७ वर्षीय युवकास अनैतिक संबंधाच्या संशयावरून चाकूने भोकसून जिवे ठार मारल्याची घटना सोमवार दि. १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास आष्टी येथे घडली असून या प्रकरणी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील युवराज अशोक व्यवहारे हा दोन वर्षांपूर्वी इंगोली वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थी ये-जा करणाऱ्या क्रुझर गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याच गावातील भारत शिंदे यांची मुले देखील त्या गाडीमध्ये ये-जा करत होती. त्यामुळे भारत शिंदे यांच्या पत्नीसह तिच्या चुलत बहिणीची ओळख झाली होती. एकमेकांशी अधून-मधून बोलणे व भेटणे होत असल्यामुळे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. सदर संशयामुळे वाद झाला होता. या प्रकरणी अण्णा पवार व आंबिका अण्णा पवार यांनी कट रचला होता अशा आशयाची फिर्याद मयत युवकाचे वडील अशोक निवृत्ती व्यवहारे यांनी मोहोळ पोलिसांत दिली असून वरील चार जणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके करीत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास झोपेतच केला गेम दरम्यान, सोमवार दि. १६ जून रोजी युवराज हा घरासमोरील पटांगणात झोपलेला असताना युवराज अशोक व्यवहारे यास प्रशांत शिंदे याने मागून पकडले व दत्ता पवार याने चाकूने छातीवर वार करून भोकसून जमिनीवर ढकलून देऊन ठार मारले आहे.
Source link
आष्टी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून:महिलेसह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल