Headlines

कांदिवलीत 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार:किरीट सोमय्या आक्रमक, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची मागणी




मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून, त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांची माहिती जाणून घेतली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याबरोबरच या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मुंबईकरांवर लांच्छन’, सोमय्यांचा संताप या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पीडित 14 वर्षीय मुलीशी आपली बातचीत झाली असून, यावेळी तिचे कुटुंबीयही उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता केवळ गुन्हा दाखल करून थांबता कामा नये, तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी तपासाला गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. “हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार असून मुंबईकरांवर लांच्छन आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा. सध्याच्या तपास प्रक्रियेऐवजी अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी,” अशी मागणी सोमय्या यांनी केली. तसेच या आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारची कृत्ये केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या कारवायांचीही सखोल चौकशी व्हावी, असे त्यांनी नमूद केले. पोलिसांच्या तपासावरही उपस्थित केले प्रश्न या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या तपासाच्या भूमिकेवरही किरीट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आणखी काही पीडित मुली असण्याची शक्यता व्यक्त करत, पोलिसांनी त्या दिशेनेही तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. “या प्रकरणात केवळ समोर आलेल्या आरोपींपुरताच तपास मर्यादित ठेवू नये. आणखी किती मुली या प्रकाराला बळी पडल्या आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. हे प्रकरण दिसते त्यापेक्षा मोठे असण्याची शक्यता आहे,” असे सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक बाबीची चौकशी करून संभाव्य इतर पीडितांनाही न्याय मिळवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची मागणी या घटनेशी संबंधित आरोपींना कथितरीत्या मदत करणारे किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणारे काही लोक असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. काल काही सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तींकडून दबाव आणला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास निष्पक्षपणे होणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच आरोपींच्या मालमत्तांची जप्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणामागे आणखी काही लोकांचा सहभाग किंवा मोठे षडयंत्र आहे का, याचाही तपास करण्यात यावा, असे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. हेही वाचा.. रील बनवण्याच्या नादात हातातच फुटला स्काय शॉट: 21 वर्षीय तरुणाच्या हाताला 72 टाके, साडेपाच तास शस्त्रक्रिया सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि रीलला अधिकाधिक लाईक्स मिळावेत, यासाठी तरुणांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात असल्याचे पाहायला मिळते. मात्र, काही सेकंदांच्या व्हिडीओसाठी जीव धोक्यात घालण्याचे प्रकारही समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार वसईमध्ये घडला आहे. इन्स्टाग्रामसाठी हटके रील तयार करण्याच्या प्रयत्नात एका 21 वर्षीय तरुणाच्या हातातच स्काय शॉट फटाका फुटला. या दुर्घटनेत तरुणाचा हात गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्या हाताला तब्बल 72 टाके घालावे लागले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *