Headlines

केरळमध्ये ट्रकला धडकली कार, 8 ठार:मृतांत तामिळनाडूच्या अभियांत्रिकी कॉलेजचे विद्यार्थी; गाडी कापून मृतदेह काढले बाहेर




केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक कार महामार्गावर उभ्या असलेल्या लॉरी अर्थात ट्रकला धडकली. या अपघातात कारमधील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 11:40 च्या सुमारास कापामंगलम येथील पनंबिकुन्नू येथे झाला. पोलिसांनी सांगितले की, कार तामिळनाडू क्रमांकाची होती. त्यातील बहुताश जण दिंडीगुल येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर कारचे मोठे नुकसान झाले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी गाडी कापावी लागली. अपघाताचे 3 फोटो… गुरुवायुरहून कोडुंगल्लूरकडे जात होती कार मिळालेल्या माहितीनुसार, कार गुरुवायुरच्या दिशेने कोडुंगल्लूरकडे जात होती. यावेळी पनंबिकुन्नू सेंटरजवळ तिने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू लॉरीला मागच्या दिशेने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मागील भागाचेही नुकसान झाले. त्यात अडकलेल्या लोकांना स्थानिक नागरीक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने बचावकार्य राबवून बाहेर काढले. मेडिकल कॉलेजच्या शवागारात ठेवण्यात आले मृतदेह सर्व मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत. पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे आणि अपघाताच्या कारणांची चौकशी करत आहेत. पोलिसांनुसार, अद्याप मृतांच्या ओळखीची अधिकृत पुष्टी झालेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *