Headlines

कोंडी:भीमेच्या पुराचा पुळुज बंधाऱ्याला मोठा फटका; संपर्क तुटल्याने ग्रामस्थ संकटात‎, वीर धरणातून 15 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु;




भीमा नदीला आलेल्या पुराचे पाणी आता ओसरले असले तरी, पुरामुळे झालेली हानी समोर येऊ लागली आहे. या पुराचा सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्यातील पुळुज येथील बंधाऱ्याला बसला आहे. बंधाऱ्याचा रस्ता पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे भीमा नदीला पूर आला होता. या पुराने पुळुज येथील भीमेवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि वेग यामुळे बंधाऱ्यालगत असलेला पोहोच रस्ता (अप्रोच रोड) मोठ्या प्रमाणात खचला आहे. रस्त्यावरील डांबर आणि खडी वाहून गेली असून, तिथे आता फक्त मोठे दगड आणि माती उरली आहे. रस्त्याची अशी दुरवस्था झाल्याने दुचाकीवरून प्रवास करणेही अत्यंत धोकादायक बनले आहे. ग्रामस्थ जीव मुठीत धरून खराब झालेल्या रस्त्यावरून पायी किंवा दुचाकी ढकलत जाताना दिसत आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो लोक, दूध उत्पादक आणि शेतकरी ये-जा करतात. रस्ता तुटल्याने सर्वांचीच मोठी कोंडी झाली आहे. प्रतिनिधी | पंढरपूर भीमा आणि नीरा नदी खोऱ्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असली तरीही उजनीतील विसर्ग कमी झाल्याने भीमेचा पूर ओसरला आहे. वीर धरणातून नीरा नदीपात्रात १५ हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, पंढरपूर येथे भीमा नदीचा विसर्ग सुमारे ४९ हजार क्युसेकवर पोहोचला आहे. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग वाढवून १३,९११ क्युसेक करण्यात आला आहे. तसेच इतर मार्ग १,१०० क्युसेक असा एकूण १५,०१८ क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक पाहून या विसर्गात गरजेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा नीरा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना आणि पंढरपुरातील सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीपात्रात उतरणे, जनावरे सोडणे किंवा साहित्य ठेवणे टाळावे, असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग, स्थानिक प्रशासनाने केले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता प्रशासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करून बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे. ऐन पावसाळ्यात आणि सणासुदीच्या काळात रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *