Headlines

राज्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरूच:विदर्भात 'येलो अलर्ट', तर जायकवाडी धरण 95 टक्क्यांवर




राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जुलै महिन्यापाठोपाठ ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, काही भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली, तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला ‘येलो अलर्ट’ नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागपूरसह अनेक भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. हा पाऊस खरिपाच्या पिकांसाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त ठरणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ राज्यातील संततधार पावसामुळे पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे टळले आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरातील बहुतांश धरणे आता ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. मराठवाड्यासाठी सर्वांत मोठा दिलासा म्हणजे, छत्रपती संभाजीनगरमधील सर्वांत मोठे असणारे ‘जायकवाडी धरण’ तब्बल ९५ टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे मराठवाड्याचा पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती गेल्या २४ तासांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि सातारा जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकणात आता पावसाचा जोर हळूहळू कमी होताना दिसत असला, तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. ‘एल निनो’चे संकट टळले यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चे मोठे संकट घोंघावत होते. त्यामुळे जून महिना जवळपास कोरडाच गेला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाने जबरदस्त कमबॅक केले आणि आता ऑगस्टमध्येही राज्यभरात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ‘एल निनो’चा प्रभाव राज्यात फारसा जाणवला नसून सर्वत्र समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. हेही वाचा.. CG-एमपीत 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता:यूपीच्या 40 शाळांत शिरले पुराचे पाणी, बिहारमधील 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट मध्य प्रदेशात यंदाच्या मान्सून हंगामात आतापर्यंत 16.3 इंच पाऊस झाला आहे. तो सरासरीपेक्षा 18% कमी आहे. यामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान केंद्राच्या (IMD) मते, पुढील 3 दिवस राज्याच्या उत्तरेकडील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगडमध्येही पुढील तीन दिवसांपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने उत्तर छत्तीसगडमधील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, 8 ऑगस्टपासून राज्यात पावसाच्या हालचाली आणि तीव्रतेत घट होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *