Headlines

संत बाळूमामा मंदिर ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची मागणी:नांदगावी जय मल्हार सेना व सकल धनगर समाजाचे तहसीलदारांना निवेदन‎



कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच ट्रस्ट बरखास्त करून महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा, २०१८ अंतर्गत प्रशासक नियुक्त क

.

निवेदनात मंदिर ट्रस्टमध्ये ७० कोटी रुपयांहून अधिक कथित आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पदाधिकारी आणि विश्वस्तांनी संगनमताने भक्तांनी दिलेल्या देणग्या, ट्रस्टच्या मालकीची जमीन तसेच सोने-चांदीचे दागिने आणि इतर मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहारामुळे भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसल्याचे तसेच मंदिराची प्रतिमा मलिन झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, श्री विठ्ठल मंदिर आणि श्री साईबाबा संस्थानप्रमाणेच श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टवरही प्रशासक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी गंगाधर करनर, कारभारी शिंदे, बबन सोर, भगवान कोळेकर यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते. जय मल्हार सेना आणि जय मल्हार मेंढपाळ सेना यांनीही निवेदनाला समर्थन देत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *