Headlines

नगरमध्ये सुरांचा पाऊस अन् किशोरदांच्या आठवणींना उजाळा!:नगरकरांच्या तुफान गर्दीत रंगली “प्यार दिवाना होता है” मैफल; नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎



सदाबहार गायक स्व. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त किशोर कुमार फॅन क्लब, पोलाद स्टील आणि विंटेज हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘प्यार दिवाना होता है’ या कार्यक्रमाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरकरांनी मोठी गर्दी केल

.

आ. जगताप म्हणाले, व्यक्तीची खरी ओळख तिच्या विचारांतून आणि कर्तृत्वातून निर्माण होत असते. किशोर कुमार फॅन क्लबचे गायक अजय दगडे यांनी गेल्या १९ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जिवंत ठेवली असून नगरकरांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विकासाबरोबरच आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसाही जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमित कोल्हे म्हणाले, कोपरगावहून अहिल्यानगरला येताना मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र स्व. किशोरकुमार यांच्या गीतांचा आनंद घेण्यासाठी हा प्रवासही सुखद वाटला. या निमित्ताने त्यांनी मनमाड महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची अपेक्षाही व्यक्त केली. कार्यक्रमात गायक अजय दगडे आणि गायिका राधिका अत्रे यांनी किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना आपल्या सुरेल आवाजात सादर करत सभागृहातील वातावरण संगीतमय केले. प्रत्येक गीताला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. अनेक गाण्यांना श्रोत्यांनी उभे राहून प्रतिसाद दिला, तर “वन्स मोअर”च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.

नगरकर रसिकांनी दिली टाळ्यांच्या कडकडाटात दाद गायक अजय दगडे व गायिका राधिका अत्रे यांनी किशोरकुमार यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण केले. ‘प्यार दिवाना होता है’, ‘भँवरे की गुंजन’, ‘सागर किनारे दिल ये पुकारे’, ‘जीवन से भरी तेरी आँखें’, ‘कोरा कागज था ये मन मेरा’, ‘खिलते हैं गुल यहाँ’, ‘एक मैं और एक तू’, ‘… कैसा है जनाब का’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘ओ मनचली कहाँ चली’, ‘अरे दीवानो’, ‘अच्छा तो हम चलते हैं’ यांसह सुमारे ३० सदाबहार गीते सादर करण्यात आली. प्रत्येक गाण्यानंतर श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात ‘वन्स मोअर… वन्स मोअर…’ चा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *