![]()
करमाड-लाडसावंगी मार्गावरील भांबर्डा गावाजवळ टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीचालक जखमी झाला. गुरुवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. छायाबाई पुंडलिक भिसे (७९, रा. निमखेडा, ता. फुलंब्री) असे मृत
.
छायाबाई भिसे या भांबर्डा येथे एका नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आल्या होत्या. अंत्यविधी आटोपल्यानंतर त्या व भरत सोळुंके दुचाकी (एमएच २० एफडब्ल्यू २०८०) वरून निमखेड्याकडे निघाले होते. भांबर्डा गावाजवळ करमाड-लाडसावंगी मार्गावर समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. निमखेडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी करमाड पोलिसांत नोंद असून, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत तपास करत आहे.
खड्ड्यांमुळे अपघात वाढले; वाहनधारक त्रस्त या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या दोन महिन्यांत तीन जणांचा बळी गेला आहे. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.