![]()
प्रतिनिधी | लाडसावंगी भारतीय सैन्यदलाच्या निकालानंतर लाडसावंगी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लाडसावंगी परिसरातील पाच सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. सुमित रामभाऊ तिडके (रा. भाकरवाडी), शिवराज राजेश तिडके (रा. भाकरवाडी), कृष्णा प्रवीण पडूळ (रा. लाडसावंगी), भुनेश भगवान बोचरे (रा. नांदखेडा), आदित्य राधाकिसन सातभाये (रा. लाडसावंगी) या भारतीय विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड झाली आहे. या अभूतपूर्व यशामुळे लाडसावंगी येथील दत्त मंदिर परिसरातून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक दत्त मंदिर येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, बजरंग चौक, गांधी चौक आणि पडूळ गल्लीपर्यंत काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लाडसावंगी परिसरातील ५ सुपुत्रांची सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
Source link
कौतुकाची थाप:लाडसावंगी परिसरातील ५ सुपुत्रांची झाली भारतीय सैन्यदलात निवड; गावात जल्लोष, निवड झालेल्या जवानांचा ग्रामस्थांकडून सत्कार