![]()
पेठ तालुक्यातील खरपडी व फणसपाडा या दुर्गम भागांतील ७०० कुटुंबांसोबत गाडगे महाराज ट्रस्ट, नेचर क्लब, आनंद अकाउंट क्लासेस आणि गुलालवाडी व्यायामशाळेच्या सदस्यांनी दिवाळी भाऊबीज साजरी केली. संत श्री गाडगेबाबांच्या विचारांचा प्रत्यक्ष कृतीतून प्रसार करत या चार संस्थांनी सलग ३८ व्या वर्षी ‘एक करंजी, दोन लाडू’ हा उपक्रम राबवला. याअंतर्गत ५.८० क्विंटल दिवाळी फराळासह १५० साड्यांचे ज्येष्ठ महिलांना वाटप करण्यात आले. नाशिकमधील विविध मंडळांच्या सहकार्याने गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये २.७० क्विंटल तिखट व खारे फराळ, तर ३.१० क्विंटल लाडू व बर्फीचे वाटप करण्यात आले. तसेच १५० वृद्ध महिलांना साड्या देण्यात आल्या. गाडगे महाराज ट्रस्टचे कुणाल देशमुख, नेचर क्लबचे आनंद बोरा, नंदकिशोर उदावंत, सुधीर शौचे, अशोक जाधव, संजय राऊत आदींनी नाशिक शहरातील विविध दानशूर व्यक्तींकडून दिवाळी फराळासाठी साहित्य जमा केले. त्यानंतर अतिदुर्गम भागात जाऊन दोन्ही गावांतील कुटुंबांना फराळाचे वाटप करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. ७०० कुटुंबांना वाटप फराळाचे साहित्य प्रमाण शेव १०० किलो चिवडा १०० किलो चकली ७० किलो लाडू १२० किलो बर्फी १२० किलो शंकरपाळे ७० किलो साड्या १५० नग एकूण फराळ ५.८० क्विंटल वंचितांसोबत दिवाळीचा आनंद वेगळाच ^संत गाडगेबाबांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी अतिदुर्गम भागात दिवाळी फराळाचे वाटप करून वंचितांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद वाटतो. नागरिकांनी यात सहभाग घ्यावा. – कुणाल देशमुख, गाडगे महाराज ट्रस्ट
Source link
खरपडी, फणसपाड्यात 5.60 क्विं. फराळ वाटप:‘एक करंजी, दोन लाडू’ गाडगे महाराज ट्रस्ट, नेचर क्लब व आनंद अकाउंट क्लासेसने दिली भेट