![]()
आगामी गणेशोत्सवासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात बैठक पार पडली. विसर्जन मार्गासह उत्सव होणाऱ्या रोडवरील खड्डे, लोंबकळत असलेल्या विद्युत तारा, वीज मीटरसाठी भरलेली सुरक्षा ठेव न मिळणे आदींवरून गणेशभक्त आक्रमक झाले. रस्ता दुरुस
.
चार ठिकाणी विसर्जनसाठी घाट : मनपातर्फे घरगुती गणेश विसर्जनासाठी चार ठिकाणी घाटांची निर्मिती केली जाईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे कार्य लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच पथदिव्यांची दुरुस्तीही करण्यात येईल. गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या सुलभरीत्या प्राप्त होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. श्री गणेश मिरवणूक व विसर्जनाच्या कालावधीत शहरात गणेश विसर्जनासाठी मोठे टँक तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ४फुटापर्यंत गणपतींचे विसर्जन करता येईल. तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनाची सुविधा बाळापूर येथील नदी घाटावर राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
विद्युत भार नियमनाचा मुद्दा गाजला : बैठकीत गणेशभक्तांच्यावतीने गोपाल नागपुरे, सिद्धार्थ शर्मा, विठ्ठल पाटील गाढे, मनीष हिवराळे, संतोष पांडे, भरत मिश्रा, विजय तिवारी आदी मनोगत व्यक्त करीत काही मागण्या केल्या. सध्या ५ ते ३० मिनिटांसाठी अघोषित िवद्युत भार नियमन सुरु असल्याचे गणेशभक्त म्हणाले. सिटी कोतवाली ते अकोट स्टंॅडपर्यंतचे खड्डे व्यवस्थित बुजवण्यात आलेले नाहीत. परवनगीसाठी जुन्या मंडळांनाही वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. मिरवणुकीत सर्वाधिक गर्दी होणाऱ्या टिळक रोडवर पुरेसा प्रकाश असलेले दिवे लावण्यात यावेत. उत्सवाच्या काळात उघड्यावर मांस विक्री नकोे. उत्सव काळात स्वच्छतेवर भर देण्यात यावा. तडीपार, गुंड प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी गणेशभक्तांनी केली.
जिल्ह्यात १९८४ मंडळं जिल्हाधिकारी मीना म्हणाल्या की, जिल्ह्यात नोंदणीनुसार सुमारे १ हजार ९८४ मोठे व लहान गणेश मंडळे आहेत. उत्सव काळात कायदे व सुव्यवस्था राखतानाच भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा संबंधित विभागांनी उपलब्ध करुन द्याव्यात.